सध्या क्रिकेट जगात एकाच गोष्टीची चर्चा होत आहे आणि ती म्हणजे विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याची. १८ जून रोजी होणाऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघ खूप मेहनत घेत आहेत. दोन्ही संघाची फलंदाजी तगडी आहे. भारतीय संघाकडे विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा आणि अजिंक्य राहणेसारखे फलंदाज आहे तर, न्यूझीलंड संघाकडे केन विलियम्सन, रॉस टेलर, टॉम लॅथमसारखे खेळाडू आहेत. परंतु न्यूझीलंड संघाकडे एक असासुद्धा एक खेळाडू आहे, जो एकट्याच्या हिंमतीवर सामन्याचे स्वरूप बदलून टाकू शकतात. बघुयात या बातमी मधून कोण आहे तो न्यूझीलंडचा लपलेला मोहरा.
न्यूझीलंडच्या त्या खेळाडूचे नाव आहे हेन्री निकोल्स. निकोल्स असा खेळाडू आहे जो कधीही सामन्याचे रुप एकट्याने बदलू शकतो. २९ वर्षीय हेन्री निकोल्सने २०१६ साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण केले. डावखुरा फलंदाज निकोल्स ५व्या स्थानावर फलंदाजी करण्यासाठी उतरतो.
त्याने २०२१ मध्ये तीन कसोटी सामने खेळले त्यात त्याने ६५.५०च्या सरासरीने २६२ धावा केल्या आहेत. त्याने पाकिस्तान विरुद्ध १५७ धावांची खेळी देखील केली आहे. हल्लीच त्याने लॉर्ड्समध्ये तब्बल १७५ चेंडूंचा सामना करत ६१ धावा केल्या.
निकोल्सच्या कसोटी कारकीर्दीवर नजर टाकल्यास तुम्हाला कळेल की हेनरी निकोल्स मधल्या फळीसाठी उत्तम फलंदाज आहे. त्याने आजवर न्यूझीलंड संघासाठी ३९ कसोटी सामने खेळले आहेत, त्यात त्याने ४३.४०च्या सरासरीने २२५७ धावा केल्या. निकोल्सने ५८ डावात ७ शतकं आणि ११ अर्धशतकं केली आहेत. कसोटीमध्ये निकोल्सची सर्वोत्तम धावासंख्या १७४ राहिली आहे.
निकोल्सने आपल्या कारकिर्दीत ६ शतकं ही ५ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना केले आहेत. तर, १ शतक ६ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना केले आहे. निकोल्स फलंदाजीत केन विलियम्सन आणि रॉस टेलरनंतर फलंदाजीला उतरतो. भारताचा उपकर्णधार अजिंक्य राहणेची या क्रमांकावर फलंदाजी करताना ३८.८१ची सरसरी आहे आणि हेनरी निकोल्सची ४४.६० आहे. हे बघण्यात उत्सुकता असेल की, हेनरी निकोल्स आणि अजिंक्य रहाणेमध्ये आपल्या संघासाठी ५ व्या क्रमांकावर सर्वात जास्त धावा कोण करत.
महत्त्वाच्या बातम्या –
ट्रेंट बोल्टने रोहित शर्माला आयपीएल दरम्यानच दिली आहे ‘ही’ चेतावणी, आता राहावे लागणार सावध
रोहित शर्माला WTC फायनलपूर्वी व्हीव्हीएस लक्ष्मणचा ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ सल्ला
WTC फायनलसाठी कशी असायला हवी भारताची फलंदाजी क्रमवारी? व्हीव्हीएस लक्ष्मणने दिले ‘हे’ उत्तर