ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर (Australia Team On Pakistan Tour) असून उभय संघांमध्ये ३ सामन्यांची कसोटी मालिका (3 Matches Test Series) सुरू आहे. तब्बल २४ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानात क्रिकेट खेळायला गेला आहे. पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना (First Test Match) रावळपिंडी येथे ४ मार्चपासून सुरू झाला आहे. या सामन्यात यजमान पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघाचे खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर उतरवेळी हाताला काळ्या रंगाची पट्टी बांधून (Australian Players Wear Black Armband) उतरले आहेत.
ऑस्ट्रेलियाचे माजी यष्टीरक्षक फलंदाज रॉड मार्श (Rod Marsh) यांचे शुक्रवारी (४ मार्च) वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले आहे.त्यांना गुरुवारी (२४ फेब्रुवारी) तीव्र हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, आयुष्याची लढाई लढत असताना त्यांनी ऍडलेडमधील हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूनंतर क्रिकेटविश्वात शोककळा पसरली आहे. ऑस्ट्रेलिया संघानेही हाताला काळी पट्टी बांधून रॉड मार्श यांना श्रद्धांजली दिली आहे.
We are deeply saddened by the passing of Rod Marsh.
A brilliant wicketkeeper and hard-hitting batter, Rod's contribution to Australian cricket was outstanding and he will be truly missed.
Our thoughts are with his wife Ros, children Paul, Dan and Jamie and his many friends. pic.twitter.com/DXR0rEyZjx
— Cricket Australia (@CricketAus) March 4, 2022
हेही वाचा- मोठी बातमी! ऑस्ट्रेलियाचे दिग्गज यष्टीरक्षक काळाच्या पडद्याआड, यष्टीमागे घेतलेल्या ४३९ विकेट्स
ऑस्ट्रेलियाच्या यशस्वी यष्टीरक्षकांमध्ये रॉड मार्श यांची गणना होते. ते ऑस्ट्रेलियाचे तिसरे सर्वात यशस्वी यष्टीरक्षक आहेत. त्यांनी १९७० ते १९८४ असे १४ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्त्व केले. या १४ वर्षात त्यांनी ९६ कसोटी आणि ९२ वनडे सामने खेळले. त्यांनी ९६ कसोटीत ३ शतके आणि १६ अर्धशतकांसह ३६३३ धावा केल्या. तसेच त्यांनी वनडेत ४ अर्धशतकांसह १२२५ धावा केल्या.
त्याचबरोबर त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यष्टीमागे ४७९ विकेट्सही घेतल्या आहेत. यात ४६३ झेल आणि १६ यष्टीचीत विकेट्सचा समावेश आहे. ते ऑस्ट्रेलियाचे ऍडम गिलख्रिस्ट (९०५) आणि इयान हेली (६२८) यांच्यानंतर यष्टीमागे सर्वाधिक विकेट्स घेणारे यष्टीरक्षक आहेत.
पाकिस्तान- ऑस्ट्रेलियात होणार ३ कसोटी सामने
दरम्यान पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना ४-८ मार्च दरम्यान रावळपिंडी येथे खेळला जाईल. त्यानंतर कराची येथे १२ ते १६ मार्च या कालावधीत हे दोन्ही संघ दुसरा कसोटी सामना खेळतील. तर तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना लाहोर येथे होईल. हा सामना २१ ते २५ मार्च या कालावधीत खेळला जाईल.
The 24-year wait is over! The #PAKvAUS series is underway in Rawalpindi 🇵🇰🇦🇺 pic.twitter.com/adloLpNMcU
— Cricket Australia (@CricketAus) March 4, 2022
असे आहेत पहिल्या कसोटीसाठी पाकिस्तान- ऑस्ट्रेलियाचे संघ
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, अझहर अली, बाबर आझम (कर्णधार), फवाद आलम, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), इफ्तिखार अहमद, नौमान अली, साजिद खान, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेविड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टिव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, ऍलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेझलवूड.
महत्त्वाच्या बातम्या-
शंभराव्या कसोटीपूर्वी कोहलीचे ‘विराट’ काम, भटक्या जनावरांच्या मदतीसाठी उचलले ‘हे’ पाऊल
शतकी कसोटीच्या छोटेखानी खेळीत विराटने चढल्या विक्रमांच्या तीन पायऱ्या
सोपी नाही राहिली १०० कसोटी खेळणाऱ्या कोहलीची कारकिर्द, आजवर अनेक चढ-उतारांना गेलाय सामोरे, वाचा