---Advertisement---

खराब फॉर्मातील बाबरच्या मदतीला धावला दक्षिण आफ्रिकी दिग्गज, वाचा कर्णधाराला काय दिला सल्ला

On: शुक्रवार, सप्टेंबर 16, 2022 11:35 PM
Babar Azam
---Advertisement---

पाकिस्तान संघ आशिया चषक 2022 च्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला होता, पण अंतिम सामन्यात त्यांना श्रीलंका संघाने पराभवाची धूळ चारली. पाकिस्तान संघाला त्यांचा कर्णधार बाबर आझम याच्या खराब प्रदर्शनाचा देखील फटका बसल्याचे दिसले. बाबरने आशिया चषकादरम्यान खूपच निराशाजनक प्रदर्शन केले. बाबर सध्या जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असला, तरी आशिया चषकात मात्र पूर्णपणे अपयशी ठरला. बाबरला या खराब फॉर्ममधून बाहेर येण्यासाठी अनेकजण सल्ले देतानाही दिसत आहेत. या यादीत दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज हर्शल गिब्स याचाही समावेश झाला आहे. 

आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) मध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) एकही मोठी खेळू शकला नाही. त्याने या सहा सामन्यांमध्ये 68 धावा केल्या. या आकड्यांवरून स्पष्ट झाले की, बाबरने त्याचा फॉर्म गमावला आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज हर्शल गिब्स (Herschelle Gibbs) यानेही बाबरला एक खास सल्ला दिला आहे, जो त्याच्या नक्कीच कामी येऊ शकतो. गिब्सने ट्वीट करत लिहिले की, “बाबरने जर त्याच्या फलंदाजीत आक्रमणाचे एक किंवा दोन अजून पर्याय सामील केले, तर त्याचा स्ट्राईक रेट सुधारून तो अधिक प्रभावी होऊ शकतो.” गिब्सने बाबरच्या स्ट्राईक रेटमध्ये आलेली घसरण पाहून हा सल्ला दिल्याचे समजते.

आशिया चषकातील खाराब प्रदर्शनानंतर आयसीसी टी-20 क्रमवारीत देखील बाबर आझमला नुकसान सोसावे लागले आहे. कही महिन्यांपूर्वी बाबर क्रमवारीत पहिल्या क्रमवारीत होता, पण सध्या तो या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचाच सलामीवीर आणि यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिजवान (Mohammad Rizwan) सध्या क्रमांक एकचा टी-20 फलंदाज आहे. दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एडन मार्करम दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताचा सूर्यकुमार यादव टी-20 क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर आहे. आशिया चषकातील खराब प्रदर्शनानंतर बाबरकडून आगामी टी-20 विश्वचषकात चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा चाहत्यांना आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या – 

सॅमसन तयार करणार हार्दिक पंड्याला टक्कर देणारा अष्टपैलू! भारत अ संघात लागली वर्णी
टीम इंडियामध्ये एंट्री करताच ‘या’ खेळाडूने शतकी खेळी करत केला जल्लोष
दोन माजी कर्णधारांच्या करिअरची वाट लावतेय पाकिस्तान टीम! पाहा त्यांचा टी-20 वर्ल्डकपचा संघ  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---