येत्या १७ ऑक्टोबरपासून टी२० विश्वचषकाला सुरुवात होणार आहे, या विश्वचषक ओमान आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) मध्ये खेळवला जाणार आहे. त्यामुळे केवळ २ महिन्यांचा कालावधी राहिलेल्या या स्पर्धेबद्दल विविध मतं आजी-माजी क्रिकेटपटू व्यक्त करत आहेत. आता दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू हर्शेल गिब्सनेही या विश्वचषकासाठी प्रबळ दावेदार असलेल्या ३ संघांची नावं सांगितली आहेत.
हर्शेल गिब्सने इंग्लंड, पाकिस्तान आणि भारताला टी -२० विश्वचषक विजेतेपदाचे प्रमुख दावेदार म्हणून घोषित केले आहे. त्याने विराट कोहली, बाबर आझम आणि जोस बटलरचेही कौतुक केले आणि सांगितले की, या खेळाडूंमध्ये कोणत्याही परिस्थितीत चांगली कामगिरी करण्याची क्षमता आहे.
क्रिकेट पाकिस्तान वेबसाइटनुसार गिब्स म्हणाला की, “भारत, इंग्लंड आणि पाकिस्तान हे असे संघ आहेत जे विश्वचषक विजेतेपद पटकावण्याची शक्यता आहे.” त्यानी भारत आणि इंग्लंडचे एक मजबूत संघ म्हणून वर्णन केले. तर त्याने पाकिस्तानचे एक अनपेक्षित संघ म्हणून वर्णन केले. म्हणजेच, संघ कधी काय करेल याचा अंदाज लावणे कठीण आहे.
गिब्सने असेही स्पष्ट केले की, त्याने गतविजेत्या वेस्ट इंडीजला का निवडले नाही. ४७ वर्षीय माजी खेळाडूचा असा विश्वास आहे की, यूएईमधील खेळपट्ट्या फिरकीला अनुकूल असतील आणि विंडीजचे फलंदाज अशा खेळपट्टयांवर संघर्ष करतात.
विशेष म्हणजे गिब्सने ज्या तीन संघांना विजेतेपदाचे प्रबळ दावेदार म्हटले आहे, त्या तीन संघांनी टी२० विश्वचषकाचे पहिले तीन विजेतीपदं मिळवली आहेत. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २००७ मध्ये ट्रॉफी जिंकली. त्यानंतर पाकिस्तानने २००९ मध्ये ही स्पर्धा जिंकली, तर इंग्लंडने २०१० मध्ये पॉल कॉलिंगवूडच्या नेतृत्वाखाली विजेतेपद पटकावले.
महत्त्वाच्या बातम्या –
राहुल द्रविडने मानद डॉक्टरेट घेण्यास दिला होता नकार, कारण ऐकून कराल कौतुक
उमेश यादव ‘या’ कारणामुळे कसोटी संघातून होऊ शकतो ‘आउट’
‘हे’ ३ खेळाडू घेऊ शकतात रहाणेची जागा; भारताच्या कसोटी संघाचे मिळू शकते उपकर्णधारपद