---Advertisement---

रोहित-विराटमध्ये हा होणार हर्षल गिब्जचा क्वॉरंटाईन पार्टनर

On: मंगळवार, मार्च 24, 2020 8:23 AM
---Advertisement---

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव थांबण्याचे नाव घेत नाही. हा व्हायरस दिवसेंदिवस वाढतच आहे. जगातील लोकांसाठी हा व्हायरस आणखी धोकादायक होत आहे. भारताबरोबरच संपूर्ण जगात लॉकडाऊन करण्यात आले आहे.

यामुळे कोणालाही पुढील आदेश येईपर्यंत घरामधून बाहेर निघण्याची परवानगी नाही. या व्हायरसपासून संरक्षण करण्याचा एकमेव मार्ग राहिला आहे. अशा परिस्थितीत सेल्फ आयसोलेशन (Self Isolation) पाहता आयसीसीने (ICC) लोकांना विचारले की, तुम्ही आपल्या जन्मतारखेनुसार कोणाला आपला क्वॉरेंटाईन पार्टनर म्हणून निवडाल?

यावेळी दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू हर्शल गिब्सने (Herschelle Gibbs) या ट्वीटला प्रत्युुत्तर दिले आहे. यामध्ये त्याने लिहिले की, “मी विराट कोहलीला (Virat Kohli) क्वॉरेंटाईन म्हणून निवडेल. आम्ही एकमेकांच्या सोबतीने राहू.”

46 वर्षीय गिब्सचा जन्म 23 फेब्रुवारीला झाला होता. त्यामुळे यादीत फेब्रुवारीच्या पुढे विराटचे नाव होते. तरी गिब्सने हे स्पष्ट केले की विराटबरोबर क्वॉरेंटाईनचा वेळ मी जिममध्ये घालवेल.

ट्रेंडिंग घडामोडी-

-कोरोना व्हायरसविरुद्ध लढ्यात क्रिकेटपटूंना इंंन्शुरन्स देणार हे देशातील पहिलं राज्य

-कोरोनाने १५०० पेक्षा जास्त जीव घेतलेल्या देशात फसले आयपीएल प्लेअरचे वडिल

-त्याच हाॅटेलमध्ये कनिका कपूर थांबली होती, जिथं होता आफ्रिका संघाचा मुक्काम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---