आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर(आरसीबी) संघाने न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माईक हेसन यांना क्रिकेट कार्यकारी संचालक म्हणून तर ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज सिमन कॅटिच यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे.
तसेच बेंगलोर संघाने मागील मोसमात संघाचे मार्गदर्शक आणि प्रशिक्षक असलेले गॅरी कर्स्टन आणि गोलंदाजी प्रशिक्षक आशिष नेहरा यांच्यापासून मार्ग वेगळे केले आहेत. त्यामुळे आता 2020च्या आयपीएल मोसमात सिमन कॅटिच प्रशिक्षक म्हणून दिसतील तर हेसन कार्यकारी संचालक म्हणून काम पाहतील.
याबद्दल क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार बेंगलोर संघाचे अध्यक्ष संजिव चूरीवाला म्हणाले, ‘आरसीबीला विश्वासू, सन्माननीय आणि सर्वोत्तम कामगिरी करणारा टी20 संघ बनवण्याचा उद्देश आहे. म्हणूनच आमच्या संघाच्या प्रत्येक सदस्यासाठी उत्कृष्टतेची आणि उच्च कामगिरीची संस्कृती तयार करण्याचा प्रयत्न आहे.’
‘हे ध्येय पूर्ण करण्यासाठी माईक हेसन आणि सिमन कॅटिच यांची नियुक्ती करताना आम्हाला आनंद होत आहे. आम्हाला विश्वास आहे की माईक यांचा एक मजबूत संघ बनवण्याचा अनुभव आणि सिमनयांचा क्रिकेटमधील मोठा अनुभव संघांत विजयाची संस्कृती तयार करण्यात मदत करेल.’
‘तसेच ही पुर्नबांधणी करण्याचा परिणाम म्हणून आम्ही एक प्रशिक्षक मोडेलचा विचार करत आहोत. त्यामुळे आम्ही गॅरी कर्स्टर्न आणि आशिष नेहरा यांनी मागील दोन वर्षात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे आभार मानतो.’
‘ते आम्हाला सोडून जाताना अनेक युवा क्रिकेटपटूंना उच्च स्तरावर त्यांची क्षमता दाखविण्याचा आत्मविश्वास देण्याचा एक वारसाही मागे सोडून जात आहेत. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघातील प्रत्येक जण त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहे.’
बेंगलोर संघासाठी क्रिकेट कार्यकारी संचालक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या हेसन यांचे नाव मागील काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट वर्तुळात चर्चेत आहे.
ते भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठीचे एक उमेदवार होते. तसेच त्यांची या प्रशिक्षकपदासाठी अंतिम 3 उमेदवारांमध्ये रवी शास्त्रींपाठोपाठ दुसऱ्या स्थानी निवड झाली होती. मात्र मुलाखतींमध्ये शास्त्री यांनी बाजी मारल्याने हेसन यांची भारतीय प्रशिक्षकपदासाठी अंतिम निवड झाली नाही.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–व्हिडिओ:…म्हणून जॉन्टी ऱ्होड्सची झाली नाही फिल्डींग कोचसाठी निवड, प्रसाद यांचा खूलासा
–टीम इंडियाला मिळाला नवीन बॅटिंग कोच, तर यांना मिळाली फिल्डींग, बॉलिंग कोचची जबाबदारी
–जेव्हा जोफ्रा आर्चर करतो स्टिव्ह स्मिथच्या बॅटिंगची कॉपी, पहा व्हिडिओ