---Advertisement---

रायडू-विजय जोडी चमकली, संघाला संकटातून बाहेर काढताना केला हा मोठा पराक्रम

On: रविवार, फेब्रुवारी 3, 2019 2:16 PM
---Advertisement---

वेलिंगटन। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात आज(3 फेब्रुवारी) पाचवा वनडे सामना वेस्टपॅक स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 49.5 षटकात सर्वबाद 252 धावा केल्या.

या सामन्यात भारताची सुरुवात खराब झाली होती. भारताने 18 धावांवरच पहिल्या 4 विकेट्स गमावल्या होत्या. पण त्यानंतर अंबाती रायडू आणि विजय शंकर यांनी मिळून पाचव्या विकेटसाठी 98 धावांची भागीदारी रचत भारताचा डाव सावरला.

त्यामुळे रायडू आणि शंकर यांची ही भागीदारी न्यूझीलंड विरुद्ध वनडेत पहिल्या 4 विकेट्स 20 धावांच्या आत गेल्यानंतर पाचव्या विकेटसाठी केलेली सर्वोत्तम भागीदारी ठरली आहे.

या आधी हा विक्रम स्कॉटलंडच्या मॅट मचन आणि रिची बेरिंगटन यांनी केला होता. त्यांनी  2015मध्ये  विश्वचषकात न्यूझीलंड विरुद्ध 12 धावांतच 4 विकेट्स गमावल्यानंतर पाचव्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी केली होती.

आजच्या सामन्यात रायडू 90 धावांवर असताना मॅट हेन्रीच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यामुळे तो न्यूझीलंडमध्ये वनडेत नाईंटीज(90 ते 99 धावांदरम्यान) मध्ये बाद होणारा पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे.

या सामन्यात रायडूने 90 धावा करताना 8 चौकार आणि 4 षटकार मारले. तसेच त्याने शंकर 45 धावांवर बाद झाल्यानंतर केदार जाधव बरोबर सहाव्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी केली.

केदारने 34 धावा तर शेवटच्या काही षटकात फलंदाजीसाठी आलेल्या हार्दिक पंड्याने तुफानी फलंदाजी करताना 5 षटकार आणि 2 चौकारांसह 45 धावांची खेळी केली. त्यामुळे भारताला 250 धावांचा टप्पा पार करता आला.

महत्त्वाच्या बातम्या-

रोहित शर्माची ती शतकांची मालिका अखेर खंडीत

प्रो कबड्डीसाठी ५ फेब्रुवारीला मुंबईत पंचांची ट्रायल्स

१० वर्षानंतर हार्दिकने केली सचिनच्या त्या विक्रमाची बरोबरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment