---Advertisement---

नॉर्मल वाटलो का! ऑस्ट्रेलियाने 10 विकेट्स गमावत केला वनडेतील दुसरा सर्वोच्च स्कोर, पाहा यादी

On: शनिवार, ऑक्टोबर 28, 2023 2:52 PM
Travis-Head-And-David-Warner-AUS
---Advertisement---

विश्वचषक 2023 स्पर्धेत सलग पहिले 2 सामने गमावणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाने पुन्हा एकदा लय पकडली आहे. ऑस्ट्रेलियाने पुढील तिन्ही सामने जिंकल्यानंतर आता सहाव्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्धही धमाकेदार प्रदर्शन केले आहे. शनिवारच्या (दि. 28 ऑक्टोबर) पहिल्या डबल हेडर सामन्यात धरमशाला येथे न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी प्राथमिकरीत्या चुकीचा ठरवला आणि अशी काही फटकेबाजी केली की, त्यांच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली.

ऑस्ट्रेलियाचा धमाकेदार विक्रम
ऑस्ट्रेलिया (Australia) संघाने न्यूझीलंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना तीनशेहून अधिक धावा केल्या. त्यांनी यादरम्यान निर्धारित 50 षटकात सर्व विकेट्स गमावत 388 धावसंख्या उभारली. एवढी मोठी धावसंख्या उभारताच ऑस्ट्रेलियाच्या नावावर मोठा विक्रम नोंदवला गेला. वनडे क्रिकेटमध्ये दहाच्या दहा विकेट्स गमावत सर्वाधिक धावा उभारणाऱ्या संघांच्या यादीत ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानी पोहोचला. ऑस्ट्रेलियाने यावेळी इंग्लंड आणि पाकिस्तानलाही पछाडले.

वनडेत सर्व विकेट्स गमावत सर्वोच्च धावसंख्या विंडीजच्या नावे
वनडे क्रिकेटमध्ये सर्व विकेट्स गमावत सर्वोच्च धावसंख्या उभारणाऱ्या संघांच्या यादीत वेस्ट इंडिज अव्वलस्थानी आहे. त्यांनी 2019मध्ये सेंट जॉर्ज येथे इंग्लंडविरुद्ध खेळताना 389 धावा केल्या होत्या. यादीत तिसऱ्या स्थानी इंग्लंड संघ असून त्यांनी 2023मध्ये द ओव्हल मैदानात न्यूझीलंडविरुद्ध खेळताना 368 धावसंख्या उभारली होती. यादीत चौथ्या स्थानी पुन्हा इंग्लंडचाच नंबर असून त्यांनी 2018मध्ये एडिनबर्ग येथे स्कॉटलंडविरुद्ध खेळताना 365 धावांचा डोंगर उभारला होता. याव्यतिरिक्त पाचव्या स्थानी पाकिस्तान संघ असून त्यांनी 2007मध्ये किंग्स्टन येथे झिम्बाब्वेविरुद्ध खेळताना 349 धावा केल्या होत्या.

वनडेत सर्व विकेट्स गमावूनही सर्वोच्च धावा करणारे संघ
389- वेस्ट इंडिज, विरुद्ध- इंग्लंड, 2019 (सेंट जॉर्ज)
388- ऑस्ट्रेलिया, विरुद्ध- न्यूझीलंड, 2023 (धरमशाला)*
368- इंग्लंड, विरुद्ध- न्यूझीलंड, 2023 (द ओव्हल)
365- इंग्लंड, विरुद्ध- स्कॉटलंड, 2018 (एडिनबर्ग)
349- पाकिस्तान, विरुद्ध- न्यूझीलंड, 2007 (किंग्स्टन)

ऑस्ट्रेलियासाठी हेडचे शतक
यावेळी ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करताना ट्रेविस हेड (Travis Head) चमकला. त्याने या सामन्यात सर्वोच्च धावसंख्या केली. त्याने 67 चेंडूत 7 षटकार आणि 10 चौकारांच्या मदतीने 109 धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त डेविड वॉर्नर यानेही 81 धावांचे योगदान दिले. तसेच, ग्लेन मॅक्सवेल (41), जोश इंग्लिस (38), पॅट कमिन्स (37) आणि मिचेल मार्श (36) यांनीही संघाच्या धावसंख्येत खारीचा वाटा उचलला. (Highest all-out totals in ODIs australian on 2nd number)

हेही वाचा-
सलामीवीरांच्या तडाख्यामुळे ऑस्ट्रेलियाची मोठी धावसंख्या! वाढला न्यूझीलंडच्या फलंदाजांवरील दबाव
CWC 23 Points Table: पाकिस्तानच्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या आशांना झटका, दक्षिण आफ्रिकेने भारताला पछाडले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---