आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला ९ एप्रिलपासून चेन्नई येथे सुरुवात होत आहे. कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे सलग दुसऱ्या वर्षी ही जगातील सर्वात मोठी व्यवसायिक क्रिकेट लीग बंद दाराआड आणि विनाप्रेक्षक पार पडेल. आयपीएलमध्ये आतापर्यंत अनेक शतके ठोकली गेली आहेत. ख्रिस गेलच्या नावे सर्वाधिक ६ शतके असून ५ शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर, आरसीबीचा कर्णधार विराट कोहली आहे. इतरही अनेक फलंदाजांनी एक किंवा दोन शतके लगावले आहेत. मात्र, आयपीएलच्या इतिहासातील सर्वाच्च वैयक्तिक खेळ्या कोणी केल्या आहेत, हे आपणास माहीत आहे का?
चला तर जाणून घेऊया आयपीएल इतिहासात सर्वाच्च वैयक्तिक खेळी करणाऱ्या ५ खेळाडूंबद्दल
ख्रिस गेल
आयपीएल इतिहासात सर्वाधिक वैयक्तिक खेळी करणाऱ्या खेळाडूंमध्ये अव्वल क्रमांकावर आहे वेस्ट इंडिज संघाचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल. गेलने २०१३ साली बेंगलोर येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळताना पुणे वॉरिअर्सविरुद्ध अवघ्या ६६ चेंडूत १३ चौकार आणि १७ षटकारांच्या मदतीने तब्बल १७५ धावांची नाबाद खेळी केली होती. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट हा २६५.१५ होता. गेलचा आयपीएल इतिहासातील सर्वाधिक वैयक्तिक धावांचा विक्रम आतापर्यंत कोणालाही मोडता आलेला नाही.
ब्रेंडन मॅक्युलम
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे न्यूझीलंडचा धडाकेबाज फलंदाज ब्रेंडन मॅक्युलम. २००८ साली आयपीएलच्या पहिल्याच मोसमातील पहिल्याच सामन्यात मॅक्युलमने हा कारनामा केला होता. कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळताना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध त्याने केवळ ७३ चेंडूत १५८ धावांची नाबाद खेळी केली होती. त्यात १० चौकार आणि १३ षटकारांचा समावेश होता. याव्यतिरिक्त केकेआर संघाने १४० धावांनी विजय मिळविला होता, तर मॅक्युलमला ‘सामनावीर’ पुरस्काराने सन्मानित केले होते.
एबी डिव्हिलियर्स
‘मिस्टर ३६०’ या नावाने प्रसिद्ध असलेला दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज माजी कर्णधार एबी डिविलियर्स या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. त्याने २०१५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळताना मुंबई इंडियन्सविरुद्ध ५९ चेंडूत १३३ धावांची नाबाद वैयक्तिक खेळी केली होती. यामध्ये १९ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश आहे. तो सामना आरसीबीने ३९ धावांनी जिंकला होता.
केएल राहुल
भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज केएल राहुल या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर विराजमान आहे. राहुलच्या नावे कोणत्याही भारतीय फलंदाजाकडून एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे. राहुलने २०२० आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरूद्ध ६९ चेंडूत नाबाद १३२ धावांची खेळी केलेली. या खेळी दरम्यान त्याने १४ चौकार व ७ उत्तुंग षटकार लगावलेले.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये षटकार म्हटलं की रोहित-विराट नाही, तर ‘हे’ तीघे फलंदाज आहेत सर्वात पुढे
महाकठीण! आयपीएलमधील धोनी-कोहलीने केलेले ‘हे’ विक्रम रोहितलाही मोडणे आहे केवळ अशक्य
मानलं तुम्हाला! आयपीएलमध्ये एकही शतक न करता ‘या’ तीन दिग्गजांनी ठोकल्यात चार हजार धावा