नेपीयर। भारतीय संघाने आज(23 जानेवारी) न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात 8 विकेट्सने विजय मिळवत न्यूझीलंड दौऱ्याची यशस्वी सुरुवात केली आहे.
या सामन्यात भारतासमोर प्रखर सुर्यप्रकाशामुळे डकवर्थ लूईस नियमानुसार 49 षटकात 156 धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला विजयासाठी केवळ 24 धावांची आवश्यकता असताना अंबाती रायडूला कर्णधार विराट कोहली बाद झाल्याने फलंदाजीला यावे लागले.
त्याने शिखर धवनला चांगली साथ देताना 2 चौकारांसह नाबाद 13 धावा केल्या. याबरोबरच त्याची वनडेत धावांचा यशस्वी पाठलाग करतानाची त्याची सरासरी ही 103.33 अशी झाली आहे. त्यामुळे तो वनडेत धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक सरासरी असणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये (सामन्यात कमीतकमी 15 मिनीटे फलंदाजी केलेले क्रिकेटपटू) अव्वल क्रमांकावर आला आहे.
त्याच्या पाठोपाठ या यादीत भारताचा यष्टीरक्षक एमएस धोनी असून त्याची सरासरीही 103.07 अशी आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर कर्णधार विराट कोहली असून वनडेत धावांचा पाठलाग करताना त्याची सरासरी ही 96.94 एवढी आहे.
आजच्या सामन्यात शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी भारताकडून चांगली सुरुवात करत 41 धावांची भागीदारी केली. त्यानंतर शिखर आणि विराट कोहलीने 91 धावांची भागीदारी करत भारताला विजयाच्या समीप पोहचवले होते.
या सामन्यात शिखरने नाबाद 75 धावांची खेळी केली तर विराटने 45 आणि रोहितने 11 धावांची खेळी केली. त्यामुळे भारताने 156 धावांचे आव्हान 34.5 षटकात सहज पार केले.
तत्पूर्वी न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी करताना 38 षटकात सर्वबाद 157 धावा करता आल्या होत्या.
या सामन्यात भारताकडून कुलदीप यादवने 39 धावांत सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद शमीने 19 धावांत 3, युजवेंद्र चहलने 43 धावांत 2 आणि केदार जाधवने 17 धावांत 1 विकेट्स घेतल्या.
वनडेत धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक सरासरी असणारे क्रिकेटपटू (सामन्यात कमीतकमी 15 मिनीटे फलंदाजी केलेले क्रिकेटपटू) –
103.33 – अंबाती रायडू
103.07 – एमएस धोनी
96.94 – विराट कोहली
91.00 – रसल अरनॉल्ड
86.25 – मायकल बेवन
82.77 – एबी डिविलियर्स
महत्त्वाच्या बातम्या-
–त्या ५ धावा विराट कोहलीला पडल्या भलत्याच महागात!
–धोनीचा तो सल्ला कुलदीप यादवसाठी ठरला सर्वात मौल्यवान, पहा व्हिडिओ
–शिखर धवनने १०वी धाव घेताच केला हा गब्बर विक्रम