सचिन तेंडुलकर याच्यानंतर भारतीय खेळाडूंपैकी सर्वाधिक विक्रम करण्याच्या बाबतीत विराट कोहली हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराटने सचिनचेही अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. अशात रविवारी (दि. 15 जानेवारी) तिरुवनंतपुरम येथे पार पडलेल्या तिसऱ्या वनडेत श्रीलंकेविरुद्ध विराटने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. विशेष म्हणजे, त्याने असा विक्रम करण्याची ही पाचवी वेळ होती. चला तर काय आहे तो विक्रम जाणून घेऊया…
भारतीय संघाकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या विराट कोहली (Virat Kohli) याने श्रीलंकेविरुद्ध 110 धावांचा सामना करताना 166 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 8 षटकार आणि 13 चौकारांचा पाऊस पाडला. विराटने शतकानंतर दीडशतकी खेळी करत एक खास विक्रम रचला.
150 for @imVkohli 👏👏
Live – https://t.co/q4nA9Ff9Q2 #INDvSL @mastercardindia pic.twitter.com/mlpfmqv1DF
— BCCI (@BCCI) January 15, 2023
विराट कोहलीचा विक्रम
विराटने दीडशे धावांचा टप्पा पार करताच तो सलामीला न येता वनडेत सर्वाधिक धावा करणारा भारताचा तिसरा फलंदाज ठरला. विशेष म्हणजे, या विक्रमात विराटने पाचव्यांदा नाव नोंदवले. या यादीत भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) आणि विराट कोहली हे संयुक्तरीत्या अव्वलस्थानी असून त्यांनी सलामीला न येता वनडेत प्रत्येकी सर्वाधिक 183 धावा चोपल्या होत्या. यानंतर दुसऱ्या स्थानी कपिल देव (Kapil Dev) असून त्यांनी नाबाद 175 धावांची खेळी साकारली होती. यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या 166 धावांसह विराट सलामीला न येता वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये चौथ्या स्थानी विराजमान झाला.
यानंतर पुढील तिन्ही क्रमांकावर विराटचे नाव आहे. विराटने सलामीला न येता वनडेत 160, 157 आणि 154 धावांची नाबाद खेळी करून दाखवली आहे.
सलामीला न येता वनडेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज
183* धावा- एमएस धोनी
183 धावा- विराट कोहली
175* धावा- कपिल देव
166* धावा- विराट कोहली*
160* धावा- विराट कोहली
157* धावा- विराट कोहली
154* धावा- विराट कोहली
भारताचा डाव
भारतीय संघाने तिसऱ्या वनडे सामन्यात प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 5 विकेट्स गमावत 390 धावा कुटल्या. तसेच, श्रीलंकेला विजयासाठी 391 धावांचे आव्हान दिले. आता श्रीलंका संघ हे आव्हान पार करून लाजीरवाणा पराभव टाळण्याचा प्रयत्न करेल. (Highest ODI Score for India as Non-Opener Virat Kohli also include)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटची बॅट बोलते! श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावत मोडला ‘मास्टर ब्लास्टर’चा मोठा रेकॉर्ड, बनला टेबल टॉपर
षटकार किंग हिटमॅनच! श्रीलंकेविरुद्ध पहिला सिक्सर मारताच धोनीला ‘या’ यादीत टाकले मागे