---Advertisement---

इंग्लंडसाठी टी20मध्ये खेळल्या गेलेल्या 5 सर्वात मोठ्या सलामी भागीदाऱ्या, ‘हा’ पठ्ठ्या सगळ्यात सामील

Jos-Buttler-And-Alex-Hales
---Advertisement---

टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत तुफान फॉर्मात असलेल्या भारतीय संघाची दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंडने दाणादाण उडवली. भारताने दिलेल्या 169 धावांचे आव्हान इंग्लंडच्या सलामीवीरांनी सहजरीत्या गाठले. यावेळी दोघेही नाबाद होते. विशेष म्हणजे, त्यांनी यासोबत आतापर्यंतची टी20 विश्वचषकातील सर्वोच्च भागीदारी रचली. एवढंच नाही, तर यापूर्वी इंग्लंडसाठी सर्वोच्च सलामी भागीदारींमध्ये ऍलेक्स हेल्स याचा समावेश होता. कोणत्या आहेत त्या खेळी, चला पाहूया…

गुरुवारी (दि. 10 नोव्हेंबर) इंग्लंडने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 168 धावा चोपल्या. हे आव्हान इंग्लंडने एकही विकेट न गमावता सलामीवीर जोस बटलर (Jos Buttler) आणि ऍलेक्स हेल्स (Aelx Hales) यांनी 170 धावा चोपल्या. तसेच, संघाला विजय मिळवून दिला. या सलामीवीरांनी साकारलेली ही टी20 क्रिकेटमधील सर्वोत्तम भागीदारी होती. यामध्ये हेल्सच्या 86 आणि बटलरच्या 80 धावांचा समावेश होता.

इंग्लंडसाठीची ही सर्वोत्तम भागीदारी सोडली, तर यापूर्वी इंग्लंड संघासाठी आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये केलेल्या सर्वोत्तम सलामी भागीदारींमध्ये ऍलेक्स हेल्स याचा समावेश आहे. 2013मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळताना हेल्स आणि मायकल लंब यांनी नाबाद 143 धावांची सलामी भागीदारी दिली होती. यानंतर तिसऱ्या स्थानावरील सलामी भागीदारींमध्ये पुन्हा हेल्स आणि बटलरचा समावेश आहे. त्यांनी 2022च्या टी20 विश्वचषक स्पर्धेत सलामीला 132 धावांची भागीदारी रचली होती.

यापूर्वी 2011मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात हेल्स आणि क्रेग कीस्वेटर यांनी नाबाद 128 धावांची सलामी भागीदारी दिली होती. त्यानंतर 2013मध्ये हेल्स आणि लंब या जोडीने पुन्हा एकदा कहर कामगिरी केली होती. त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 111 धावांची सलामी भागीदारी रचली होती. (Highest opening partnership for England in men’s T20Is)

आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये इंग्लंड संघासाठी केलेल्या सर्वोच्च सलामी भागीदाऱ्या
170*- ऍलेक्स हेल्स आणि जोस बटलर, (विरुद्ध- भारत, 2022)

143* – ऍलेक्स हेल्स आणि मायकल लंब (विरुद्ध- न्यूझीलंड, 2013)
132 – ऍलेक्स हेल्स आणि जोस बटलर (विरुद्ध- ऑस्ट्रेलिया, 2022)
128* – ऍलेक्स हेल्स आणि क्रेग कीस्वेटर (विरुद्ध- वेस्ट इंडिज, 2011)
111 – ऍलेक्स हेल्स आणि मायकल लंब (विरुद्ध- ऑस्ट्रेलिया, 2013)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
माजी इंग्लिश कर्णधाराची भारतावर सडकून टीका! म्हणाला, “एकदिवसीय विश्वचषकानंतर त्यांनी काय केलय?”
टी-20 विश्वचषकानंतर भारत आणि न्यूझीलंड मालिका रंगणार, ‘हे’ सात खेळाडू मात्र धरणार मायदेशाची वाट

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---