बर्मिंगहॅम। 2019 विश्वचषकात आज (2जूलै) भारत विरुद्ध बांगलादेश संघात 40 वा सामना एजबस्टर्न स्टेडीयमवर सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 बाद 314 धावा केल्या आहेत.
भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला योग्य ठरवत केएल राहुल आणि रोहित शर्मा या भारताच्या सलामीवीरांनी 180 धावांची सलामी भागीदारी रचली आणि भारताला भक्कम पाया उभारुन दिला. याबरोबरच त्यांची ही भागीदारी विश्वचषक इतिहासातील भारताची सर्वोत्तम सलामी भागीदारी ठरली आहे.
त्यांनी 2015 च्या विश्वचषकात रोहित आणि शिखर धवनमध्ये आयर्लंड विरुद्ध झालेल्या 174 धावांच्या सलीमी भागीदारीला मागे टाकले आहे.
या सामन्यात रोहितने 92 चेंडूत 104 धावांची शतकी खेळी केली आहे. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 5 षटकार मारले आहेत. त्याला या सामन्याच्या 30 व्या षटकात सौम्य सरकारने बाद केले. त्यामुळे त्याची आणि राहुलची 180 धावांची भागीदारीही तूटली. त्याच्यानंतर काही वेळातच 33 व्या षटकात राहुल 92 चेंडूत 77 धावा करुन बाद झाला. त्याला रुबेल हुसेनने बाद केले.
हे दोघे बाद झाल्यानंतर मात्र भारतीय फलंदाजांनी नियमित कालांतराने विकेट गमावल्या. फक्त रिषभ पंतने 48 धावा करत नंतर चांगली लढत दिली. पण अन्य फलंदाजांना खास काही करता आले नाही. बांगलादेशकडून मुस्तफिजूर रेहमानने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या.
आता बांगलादेशसमोर या सामन्यात विजयासाठी 50 षटकात 315 धावांचे आव्हान आहे.
विश्वचषकात भारतीय सलामीवीरांची सर्वोत्तम सलामी –
180 – रोहित शर्मा / केएल राहुल, 2019 (विरुद्ध बांगलादेश)
174 – रोहित शर्मा / शिखर धवन, 2015 (विरुद्ध आयर्लंड)
163- अजय जडेजा / सचिन तेंडूलकर, 1996 (विरुद्ध केनिया)
153- सचिन तेंडूलकर / विरेंद्र सेहवाग, 2003 (विरुद्ध श्रीलंका)
136- सुनील गावस्कर / के श्रीकांत, 1987 (विरुद्ध न्यूझीलंड)
महत्त्वाच्या बातम्या –
–रोहित शर्मा, विराट कोहलीने एकाच सामन्यात केला तो खास पराक्रम
–२०१९ विश्वचषकात ४ शतके करणाऱ्या रोहित शर्माचा २०११ चा ट्विट होतोय व्हायरल
–टॉप १०: बांगलादेश विरुद्ध शतकी खेळीबरोबरच हिटमॅन रोहित शर्माने केले हे खास १० विक्रम