---Advertisement---

‘रा-रा’ जोडीची कमाल! शतकी भागिदारी करत तब्बल ४७ वर्षांच्या प्रतिक्षेवर लावला अंकुश

On: गुरूवार, ऑगस्ट 12, 2021 8:39 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड संघांमध्ये लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरू आहे. भारतीय संघातील सलामीवीर फलंदाज केएल राहुल आणि रोहित शर्मा या दोघांनी मिळून शतकी भागीदारी केली आहे. यासह या दोघांनी मिळून मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

या सामन्यात इंग्लिश कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु हा निर्णय केएल राहुल आणि रोहित शर्मा या सलामी जोडीने पूर्णपणे चुकीचा ठरवला. या डावात केएल राहुलने संथ सुरुवात केली तर, रोहित शर्माने इंग्लिश गोलंदाजांवर सुरुवातीपासूनच आक्रमण सुरू ठेवले होते. भारतीय संघाने ३३ व्या षटकात १०० धावांचा पल्ला गाठला. त्यावेळी रोहित शर्मा ७५ तर केएल राहुल १६ धावांवर फलंदाजी करत होता.

मोठ्या विक्रमाला घातली गवसणी
भारतीय संघातील सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी लॉर्डसच्या मैदानावर शतकी भागीदारी करून ४७ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडून काढला आहे. यापूर्वी हा कारनामा १९७४ मध्ये सुनील गावसकर आणि फारुख इंजिनियर यांनी केला होता. तसेच त्यांच्यापूर्वीही १९५४ मध्ये विनू मांकडं आणि पंकज रॉय यांनी लॉर्ड्सच्या मैदानावर १०६ धावांची भागीदारी केली होती.(Highest opening stands at lord’s ground by Indian batsmans)

आणखी एक मोठा विक्रम केला नावावर
या शतकी भागीदारीसह केएल राहुल आणि रोहित शर्मा यांची जोडी ऑगस्ट २०१६ नंतर इंग्लंडमध्ये शतकी भागीदारी करणारी दुसरीच जोडी ठरली आहे. यापूर्वी इंग्लंडचे सलामीवीर फलंदाज डॉम सिब्ले आणि रॉरी बर्न्स यांनी २०२० मध्ये ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर शतकी भागीदारी केली होती. तसेच भारतीय विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी (१२ ऑगस्ट) रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी हा कारनामा लॉर्ड्सच्या मैदानावर केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

ENG vs IND 2nd Test Day 1 Live: भारताला पहिला धक्का, रोहितचं शतक थोडक्यात हुकलं; ४४ षटकांनंतर भारताच्या १ बाद १२६ धावा

लॉर्ड्सचं मैदान अन् प्रथम फलंदाजीचा निर्णय जणू ठरलेलं समीकरण, तरीही रूटने का निवडली गोलंदाजी?

टॉस अन् विराटचं जरा वाकडंच! इंग्लंडमध्ये आठव्यांदा कोहलीने गमावली नाणेफेक, केला नकोसा विक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---