इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या द हंड्रेड स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामात मँचेस्टर ओरिजिनल्सने सर्व विक्रम मोडले आणि स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या केली. रविवारी (२१ ऑगस्ट) नॉर्दर्न सुपरचार्जर विरुद्धच्या सामन्यात मँचेस्टर संघाने १०० चेंडूत ५ गडी गमावून २०८ धावा केल्या. द हंड्रेड स्पर्धेतील ही आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आहे. संघाला या मोठ्या धावसंख्येपर्यंत नेण्यात सलामीवीर फिलिप सॉल्ट, कर्णधार लॉरी इव्हान्स आणि युवा फलंदाज ट्रिस्टन स्टब्स यांचा मोलाचा वाटा होता. मँचेस्टरने हा सामना २३ धावांनी जिंकला.
द हंड्रेडमधील संघाची सर्वोच्च धावसंख्या
मँचेस्टर ओरिजिनल्स – २०८/५ वि नॉर्दर्न सुपरचार्जर्स, २०२२*
नॉर्दर्न सुपरचार्जर्स – २००/५ वि मँचेस्टर ओरिजिनल्स, २०२१
ट्रेंट रॉकेट्स – १९३/२ वि मँचेस्टर ओरिजिनल्स, २०२२
मँचेस्टर ओरिजिनल्स – १८८/३ वि सदर्न ब्रेव्ह्स, २०२२
बर्मिंगहॅम फिनिक्स – १८४/५ वि वेल्श फायर, २०२१
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा –
लॉकी फर्ग्यूसनच्या गोलंदाजीवर पूरनचा दमदार सिक्स, पाहा व्हिडिओ
ASIA CUP: शाहीनच्या अनुपस्थितीत ‘हा’ गोलंदाज बनणार टीम इंडियाची डोकेदुखी