दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स संघात मंगळवारी (१० नोव्हेंबर) दुबईमध्ये आयपीएल २०२०चा अंतिम सामना रंगला. या रोमहर्षक सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना मुंबईपुढे १५७ धावांचे आव्हान ठेवले. दरम्यान दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने तडाखेबंद खेळी केली आणि एक खास विक्रम आपल्या नावावर केला.
केला अंतिम सामन्यातील मोठा विक्रम
क्वालिफायर २ सामन्यात धमाकेदार फलंदाजी करणारे मार्कस स्टॉयनिस आणि शिखर धवन या सामन्यात सलामीला फलंदाजीसाठी आले होते. परंतु, त्यांना संघाला हवी तशी सुरुवात करुन देता आली. पावरप्ले संपायच्या आधीच दोघांनीही त्यांच्या विकेट गमावल्या. तर अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणेही केवळ २ धावांवर पव्हेलियनला परतला. मात्र कर्णधार अय्यरने पुढे संघाचा डाव सावरला.
अय्यरने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत ५० चेंडूत नाबाद ६५ धावांची अफलातून खेळी केली. ही कोणत्या कर्णधाराने आयपीएलच्या अंतिम सामन्यात केलेली दुसरी सर्वोच्च वैयक्तिक खेळी ठरली. अय्यरपुर्वी सनरायझर्स हैदराबादच्या नेतृत्त्वाची धुरा सांभाळत असलेल्या डेविड वॉर्नरने हा पराक्रम केला होता. त्याने २०१६ साली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध अंतिम सामन्यात ६९ धावा केल्या होत्या. तर त्याच सामन्यात बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीनेही ५४ धावांची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या नोंदवली होती.
याव्यतिरिक्त २०१३ साली चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीने अंतिम सामन्यात ६३ धावा केल्या होत्या. २०१७मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्सचे नेतृत्त्व करतेवेळी स्टिव्ह स्मिथने अंतिम सामन्यात ५१ धावा केल्या होत्या. तर रोहित शर्मानेही २०१५मध्ये अर्धशतकी खेळी करत हा विक्रम आपल्या नावावर केला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL FINAL: २०१७ ला मुंबईने केलेला कारनामा आता दिल्लीही करणार का?
कहर! एवढी चांगली कामगिरी केलेल्या बोल्टच्या नावावरही झालाय नकोसा विक्रम
बिहार निवडणूक : मुख्यमंत्री पदाच्या विजयी उमेदवाराने आजच्याच दिवशी केले होते धोनीच्या संघात पदार्पण
ट्रेंडिंग लेख-
प्रतिस्पर्ध्याला दिवसा चांदणं दाखवणारा हा ‘छोटू’ म्हणजे मुंबई इंडियन्सची जान आहे जान!!
दांडीगुल गोलंदाजीचा शेर! मुंबईचा ‘हा’ धुरंधर ठरणार पाचव्या जेतेपदाचा शिल्पकार