हॅमिल्टन। न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज संघात गुरुवारी (३ डिसेंबर) पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद ५१९ धावांवर पहिला डाव घोषित केला आहे. या डावात न्यूझीलंडकडून फलंदाजी करताना कर्णधाक केन विलियम्सनने द्विशतकी खेळी केली आहे. याबरोबरच त्याने काही खास विक्रमही केले आहेत.
केन विलियम्सनने कारकिर्दीतील सर्वोच्च खेळी केली
या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या विलियम्सनने ३६९ चेंडूत त्याचे तिसरे कसोटी द्विशतक पूर्ण केले. याबरोबरच त्याने या द्विशतकी खेळीत ४१२ चेंडूत २५१ धावा केल्या आहेत. या खेळीत त्याने ३४ चौकार आणि २ षटकार ठोकले. ही त्याची कसोटी कारकिर्दीतील सर्वोच्च वैयक्तिक खेळी ठरली आहे.
सर्वोच्च धावा करणारा फॅब फोरमधील तिसरा खेळाडू –
सध्या विलियम्सन, विराट कोहली, जो रुट आणि स्टिव्ह स्मिथ या फलंदाजांना फॅब फोर म्हणून ओळखले जाते. हे चौघेही साधारण सारख्याच वयाचे असून त्यांचे आंतरराष्ट्रीय पदार्पणही जवळपास एकाच काळात झाले आहे. तसेच या चौघांनीही गेल्या काही वर्षात त्यांच्या देशासाठी सर्वोत्तम कामगिरी केली आहे.
कसोटी बाबतीत बोलायचे झाल्यास स्मिथ हा काही प्रमाणात अन्य तिघांना वरचढ ठरलेला अनेकदा दिसून येतो. पण असे असले तरी कसोटीत सर्वोच्च वैयक्तिक खेळी करण्याच्या बाबतीत मात्र तो फॅब फोमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.
नुकतेच विलियम्सनने २५१ धावांची खेळी केल्याने तो या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर भारताचा कर्णधार विराट कोहली आहे. विराटने सन २०१९ ला पुण्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद २५४ धावांची खेळी केली होती. ही त्याची कसोटी कारकिर्दीतील सर्वोच्च वैयक्तिक खेळी ठरली.
तसेच जो रुट या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. रुटने सन २०१६ ला पाकिस्तानविरुद्ध मँचेस्टर कसोटीत २५४ धावांची खेळी केली होती. ही त्याची सर्वोच्च वैयक्तिक खेळी आहे. तसेच स्मिथची २३९ धावा ही कसोटी कारकिर्दीतील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. ही खेळी त्याने सन २०१७ ला पर्थ येथे इंग्लंडविरुद्ध खेळताना केली होती.
विशेष गोष्ट अशी की या फॅब फोरमधील विराट, विलियम्सन आणि स्मिथ यांनी त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोच्च खेळी ते संघाचे कर्णधार असताना केली आहे. केवळ रुटने जेव्हा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोच्च वैयक्तिक खेळी केली तेव्हा तो कर्णधार नव्हता.
फॅब फोर फलंदाजांची कसोटीतील सर्वोच्च खेळी –
नाबाद २५४ धावा – विराट कोहली
२५४ धावा – जो रुट
२५१ धावा – केन विलियम्सन
२३९ धावा – स्टिव्ह स्मिथ
महत्त्वाच्या बातम्या –
सामन्यादरम्यान घाबरलेल्या ‘त्या’ ऑस्ट्रेलियन फलंदाजाला केएल राहुलचा कानमंत्र
चालू सामन्यात कोडच्या साहाय्याने माहिती पुरवल्याबद्दल मॉर्गनचे मोठे भाष्य; म्हणाला…
ट्रेंडिंग लेख –
…आणि त्यादिवशी सेहवागची इतिहास रचण्याची संधी थोडक्यात हुकली
गोष्ट एका क्रिकेटची भाग १८: एकेकाळचा बाॅम्बे डक ते भारताचा प्रमुख गोलंदाज अजित अगरकर
भारताकडून २०२० मध्ये सर्वाधिक बळी घेणारे ५ गोलंदाज; ‘हा’ स्टार खेळाडू चक्क चौथ्या स्थानावर