फीफा विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी (दि. 18 डिसेंबर) अर्जेंटिना आणि फ्रांस या संघात खेळवला गेला. जगातील प्रत्येक फुटबॉल चाहत्याची अपेक्षा असते की स्टेडीयममध्ये हा अंतिम सामना बघावा. विश्वचषकाचा अंतिम सामना प्रत्यक्ष मैदानात जाऊन बघण्याचा अनुभवही वेगळा असतो आणि प्रत्येकाला हवा असतो. पण तुम्हाला माहितीयेे का की, या अंतिम सामन्याच्या तिकीटाचा दर असतो तरी किती? तिकीटाची किंमत ऐकून तुमचेही डोळे विस्फारतील.
फीफाच्या अधिकृत संकेतस्थळानुसार, कतारमध्ये खेळवल्या गेलेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात तिकीटाची जास्तीत जास्त किंमत ही तब्बल 1 लाख 27 हजार रुपये इतकी होती कमीत कमी किंमत 16000 रुपयांच्या जवळपास होती जर अमेेरिकन डॉलर्समध्ये या किंमती पाहिल्या तर महाग तिकीट हे 1600 अमेरिकन डॉलर्सला होते तर स्वस्त तिकीट 604 डॉलर्सला होते. या किमती पाहून तुम्हाला अंदाज आला असेल की तिकीटाच्या या किमती किती जास्त आहे. फ्रांस आणि अर्जेंटिना या संघामध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात सर्वात स्वस्त तिकीट हे 16000 रुपयांंना होते. मात्र, ही तिकीटे काही विशेष लोकांसाठी राखीव आहेत. तिकीटातील ही सवलत फक्त कतारच्या नागरिकांसाठी आहे. त्यामुळे जर तुम्हालाही जर यापुढे कधी फुटबॉल विश्वचषकाचा अंतिम सामना पाहण्याची इच्छा जर झाली तर खिसा नक्की ढिल्ला करावा लागेल.
अर्जेंटिना आणि फ्रांस याच्यांत रोमहर्षक सामना बघायला मिळाला. पहिल्या हाफमध्ये अर्जेंटिनाने 2-0ने आघाडी घेतली. अर्जेंटिना संघासाठी पहिला गोल कर्णधार लिओनल मेस्सी याने 23व्या मिनिटाला पेनाल्टीच्या मदतीनेे केेला.(Highest ticket rate for FIFA Final was nearly 1 Lakh 27 thousand rupees and lowest rate was 16000)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-फ्
FIFA WC FINAL: मेस्सीचा जलवा! अर्जेंटिना मध्यंतरालाच 2-0 ने आघाडीवर
“असल्या खेळपट्ट्या खेळायला देतात का?”; दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार भडकला; पंचांवरही लावले आरोप