वर्ष २०२१ आता शेवटच्या टप्प्यात आहे. यावर्षी अनेक मोठमोठे विक्रम झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच अनेक फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला. तसेच गोलंदाजांचा ही दबदबा राहिला. ज्यामध्ये प्रमुख गोलंदाजांमध्ये आशिया खंडातील गोलंदाजांचा दबदबा राहिला. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये श्रीलंका संघातील गोलंदाज चमकले, तर कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय गोलंदाजांनी बाजी मारली. या यादीत आम्ही तुम्हाला २०२१ वर्षी टॉप-५ गोलंदाजांनी केलेल्या कामगिरीबद्दल माहिती देणार आहोत. (List of highest wicket takers in 2021)
वनडे क्रिकेटमध्ये दुष्मंता चमिराचा (Dushmantha Chameera) बोलबाला राहिला. ज्याने १४ सामन्यांमध्ये २० गडी बाद केले. तर आयर्लंडच्या सिमी सिंगने १२ सामन्यात १९ गडी बाद केले. या यादीत तिसऱ्या स्थानी राहिला, तो नेपाळ संघाचा गोलंदाज संदीप लामीछाने आणि मुस्तफिजून रेहमान. या दोघांनी प्रत्येकी १८ गडी बाद केले. १७ विकेट्ससह शाकिब अल हसन आणि जोशुआ लिटल हे दोन गोलंदाज संयुक्तरित्या चौथ्या क्रमांकावर आहेत.
तसेच आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये देखील श्रीलंका संघातील गोलंदाज सर्वोच्च स्थानी राहिले. श्रीलंका संघाचा अष्टपैलू खेळाडू वनिंदू हसरंगाने(Wanindu Hasaranga) २० सामन्यात ३६ गडी बाद केले, तर दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज तबरेज शम्सीने (tabrez shamsi) देखील इतकेच गडी बाद केले.
परंतु, वनिंदू हसरंगा धावा आणि सामन्यांच्या बाबतीत थोडा पुढे आहे. तसेच युगांडा संघातील गोलंदाज नकरानी ३५ गडी बाद करत तिसऱ्या स्थानी आहे. वसिम अब्बास २९ आणि मुस्तफिजूर रेहमान २८ विकेट्ससह अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहे.
तसेच कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय गोलंदाजांचा दबदबा राहिला. भारतीय संघाकडून आर अश्विनने (R Ashwin) ९ सामन्यात ८९९ धावा खर्च करत ५४ गडी बाद केले, तर दुसऱ्या स्थानी शाहीन आफ्रिदी(Shaheen Afridi) आहे, ज्याने ४७ गडी बाद केले. ४१ गडी बाद करत हसन अली तिसऱ्या स्थानी आहे. चौथ्या क्रमांकावर ३९ विकेट्सह जेम्स अँडरसन आणि ३७ विकेट्ससह ऑली रॉबिन्सन पाचव्या क्रमांकावर आहे. त्यांच्यापाठोपाठ ३६ गडी बाद करत अक्षर पटेल (Axar Patel) सहाव्या स्थानी आहे.
महत्वाच्या बातम्या :
दक्षिण अफ्रिका दौऱ्यात पहिल्या घासाला खडा लागण्याची शक्यता; ‘हे’ आहे कारण
काय रे हे? या तिघांना पूर्ण कारकिर्दीत दुहेरी धावसंख्या गाठताना आले नाकीनऊ
भुवनेश्वर कुमारने शेअर केला नवजात मुलीचा पहिला फोटो; चाहते म्हणाले, ‘नाव तरी सांगा’