---Advertisement---

भारतीय महिलांनी मालिका गमावली, पण ‘हा’ भलामोठा विक्रम केला नावावर; इंग्लंडलाही पछाडलं

On: शनिवार, डिसेंबर 17, 2022 11:53 PM
Harmanpreet-Kaur
---Advertisement---

ऑस्ट्रेलियन महिला संघाने शनिवारी (दि. 17 डिसेंबर) चौथ्या टी20 सामन्यात भारतीय महिला संघावर 7 धावांनी विजय मिळवला. ब्रेबॉर्न स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात पराभूत होताच भारताने ही मालिका 1-3ने गमावली. असे असले, तरीही भारतीय संघाने यादरम्यान शानदार विक्रम आपल्या नावावर केला. हा विक्रम करत भारताने बलाढ्य इंग्लंड संघालाही मागे टाकले आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे तो विक्रम…

सामन्याचा आढावा
झाले असे की, चौथ्या टी20 सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी पहिल्यांदा फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघाने निर्धारित 20 षटकात 3 विकेट्स गमावत 188 धावा चोपल्या आणि भारतापुढे 189 धावांचे आव्हान उभे केले. हे आव्हान पार करताना भारतीय संघ निर्धारित 20 षटकात 5 विकेट्स गमावत फक्त 181 धावाच करू शकला. त्यामुळे भारताला या सामन्यात 7 विकेट्सने पराभव पत्करावा लागला. मात्र, यावेळी भारताच्या नावावर खास विक्रम नोंदवला गेला.

भारतीय महिलांचा विक्रम
तो विक्रम असा की, भारतीय संघ आंतरराष्ट्रीय महिला टी20 क्रिकेटमध्ये अर्धशतकाशिवाय सर्वाधिक धावसंख्या करणारा अव्वल क्रमांकाचा संघ बनला. भारताकडून या सामन्यात एकाही खेळाडूने अर्धशतक झळकावले नाही. मात्र, तरीही भारत या सामन्यात 181 धावांपर्यंत पोहोचला आणि विक्रम नावावर केला. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर बलाढ्य इंग्लंडचा महिला संघ आहे. इंग्लंडने 2022मध्येच दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध 6 विकेट्स गमावत एकही अर्धशतक न करता 176 धावा चोपल्या होत्या.

या यादीत तिसऱ्या स्थानी वानुआतू संघ आहे. या संघाने एकाही फलंदाजाच्या अर्धशतकाविना 2022मध्येच फिजी संघाविरुद्ध 6 विकेट्स गमावत 172 धावांपर्यंत मजल मारली होती. या यादीत वानुआतू संघासोबत संयुक्तरीत्या तिसऱ्या स्थानी भारतीय संघच आहे. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात एकाही फलंदाजाच्या अर्धशतकाविना 5 विकेट्स गमावत 172 धावा केल्या होत्या. या यादीत शेवटच्या स्थानी पुन्हा इंग्लंड संघ आहे. इंग्लंडने 2019मध्ये पाकिस्तानविरुद्ध फलंदाजी करताना एकाही फलंदाजाच्या अर्धशतकाशिवाय 3 विकेट्स गमावत 170 धावा केल्या होत्या. (Highest women’s T20I total without a fifty see list)

आंतरराष्ट्रीय महिला टी20 क्रिकेटमध्ये अर्धशतकाविना सर्वाधिक धावा करणारे संघ
181/5- भारत, विरुद्ध- ऑस्ट्रेलिया (2022)*

176/6- इंग्लंड, विरुद्ध- दक्षिण आफ्रिका (2022)
172/6- वानुआतू, विरुद्ध- फिजी (2022)
172/5-  भारत, विरुद्ध- ऑस्ट्रेलिया (2022)
170/3- इंग्लंड, विरुद्ध- पाकिस्तान (2019)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘आयपीएल त्याच्यासाठी बनली नाहीये, तो…’ दिनेश कार्तिकने कुणाबद्दल केले भाष्य?
बीसीसीआयशी पंगा घेणाऱ्या रमीज राजांचे अध्यक्षपद धोक्यात? ‘हा’ आहे नवीन दावेदार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---