---Advertisement---

2026 मध्ये धमाका करण्यासाठी रोहित शर्माची ‘खास’ तयारी! हिटमॅनचा सराव करतानाचा व्हिडिओ व्हायरल

On: मंगळवार, जानेवारी 6, 2026 7:53 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा सुपरस्टार खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma) आता फक्त वनडे (ODI) फॉरमॅटमध्ये खेळताना दिसतो. त्यामुळे दोन मालिकांमधील वेळेचा वापर तो जोरदार तयारीसाठी करतो. भारतीय संघ 11 जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका खेळणार असून, रोहितने यासाठी आतापासूनच कंबर कसली आहे. 2025 प्रमाणेच 2026 मध्येही आपली बॅट तळपत राहावी आणि संघातील स्थान पक्के राहावे, असा रोहितचा प्रयत्न आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेनंतर आता भारत न्यूझीलंडचा (IND vs NZ) सामना करणार आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ थेट जून महिन्यात वनडे खेळणार आहे, त्यामुळे या मालिकेत चांगली कामगिरी करणे खेळाडूंसाठी महत्त्वाचे आहे. रोहित शर्मा सध्या मुंबईत सराव करत असून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

रोहित फक्त फलंदाजीच नाही, तर फील्डिंग कोच टी. दिलीप (T. Dilip) यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्ररक्षणाचाही जोरदार सराव करत आहे. वाढत्या वयातही चपळता टिकवून ठेवण्यासाठी तो मेहनत घेत आहे.

रोहित शर्मा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने नुकत्याच झालेल्या विजय हजारे ट्रॉफी 2025-26 मध्ये दोन सामने खेळले आणि त्यापैकी एका सामन्यात शानदार शतक झळकावले. आता फक्त एकच फॉरमॅट खेळत असल्यामुळे रोहित सरावासाठी जास्त वेळ देऊ शकत आहे, जेणेकरून मालिका सुरू होण्यापूर्वीच तो पूर्णपणे फॉर्ममध्ये (Lhythm) असेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---