---Advertisement---

क्या से क्या हो गया! दहा दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करणारा टीम पेन झाला वॉटर बॉय

On: रविवार, जानेवारी 24, 2021 7:29 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान नुकतीच 4 कसोटी सामन्यांची बॉर्डर -गावसकर मालिका पार पडली आहे. या मालिकेमध्ये कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी करत ऑस्ट्रेलियाचा 2-1 ने पराभव केला.

भारताच्या या विजयाबद्दल कर्णधार अजिंक्य रहाणेचे कौतुक होत असतानाच ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनवर टीकेची झोड उठवली जात आहे. ऑस्ट्रेलियाच्या पराभवाला पेनची बचावात्मक रणनीती जबाबदार असल्याचे म्हटले जात आहे. अनेक दिग्गजांनी पेनच्या संघातील स्थानाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अशातच ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बिग बॅश लीग मधील एक फोटो प्रचंड मोठ्या प्रमाणात वायरल होत असून, ज्यात टीम पेन इतर खेळाडूंसाठी पाणी नेताना दिसत आहे.

पेन बिग बॅश लिग मध्ये होबार्ट हरीकेन्स संघाचे प्रतिनिधित्व करतो. मात्र नुकत्याच सिडनी सिक्सर विरुद्ध पार पडलेल्या सामन्यात त्याचा अंतिम अकराच्या संघात समावेश करण्यात आला नाही. या सामन्यादरम्यान पेन इतर खेळाडूंना मदत करताना पाणी घेऊन जाताना दिसला. होबार्ट हरिकेन्सने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर हा फोटो शेअर केला आहे. या फोटोवर अनेक चाहत्यांनी मजेशीर कमेंट करत पेनची फिरकी घेतली आहे.

भारताविरुद्धची मालिका गमावल्याने पेनवर मोठ्या प्रमाणात दबाव वाढला आहे. स्टीव स्मिथ संघात परतल्याने पेन ऐवजी स्मिथ कडे कर्णधारपद सोपवावे अशीही मागणी आता केली जात आहे. त्यामुळे आगामी काळात ऑस्ट्रेलियन संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका खेळणार असून या मालिकेत विजय मिळवण्याचे मोठे दडपण टीम पेनवर असेल.

महत्वाच्या बातम्या:

एकाच चेंडूवर फलंदाज दोनदा रन आउट? पाहा बिग बॅश लीगमधील धमाल व्हिडिओ

बापरे! रिषभ पंतने इतके इंजेक्शन घेऊन साकारली होती सिडनीतील ९७ धावांची खेळी

जॉनी बेअरिस्टोला भारताविरुद्धच्या संघात स्थान नाही, माजी कर्णधाराने निर्णयाचा पुनर्विचार करण्याचे केले आवाहन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---