ऑस्ट्रेलियामध्ये सध्या बिग बॅश लीग टी-२० स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेत दररोज नवनवीन रोमांचक घटना बघायला मिळत असतात. दर्जेदार क्षेत्ररक्षण ते श्वास रोखून धरायला लावणारी फलंदाजी, असे सगळे क्षण या स्पर्धेत अनुभवायला मिळतात. आत्ताही असाच एक गमतीशीर व्हिडिओ समोर आला आहे.
त्याचे झाले असे की, बिग बॅश मध्ये अॅडलेड स्ट्रायकर्स आणि सिडनी थंडर्स यांच्यातील सामना सुरु होता. या सामन्यात १० व्या षटकात सिडनी थंडर्सकडून ख्रिस ग्रीन गोलंदाजी करत होता. तर अॅडलेड स्ट्रायकर्सचा फिलिप साॅल्ट फलंदाजी करत होता. त्याने सरळ फटकावलेला चेंडू गोलंदाजी करणाऱ्या ग्रीनच्या हाताला लागून स्टंपला लागला. त्यामुळे नॉन-स्ट्रायकर एंडला असलेला जॅक विदरराल्ड बाद असल्याचे अपील सिडनी थंडर्सच्या खेळाडूंनी केले.
मात्र विदरराल्ड क्रीजमध्ये परत असल्याची शक्यता लक्षात घेऊन मिड ऑफ वरील क्षेत्ररक्षकाने प्रसंगावधान दाखवत विकेटकीपर सॅम बिलिंग्जकडे थ्रो केला. त्याचवेळी स्ट्राईकवर असलेला फलंदाज धाव घेण्यासाठी पळाल्यामुळे विदरराल्डला देखील पाळावे लागले. मात्र बिलिंग्जने अप्रतिम क्षेत्ररक्षण करत त्याला धावबाद केले. टीव्ही अंपायरने त्यांनतर पाहिलेल्या रिप्लेमध्ये विदरराल्ड गोलंदाजांच्या एंडलाच धावबाद झाले असल्याचे दिसून आले. मात्र तिथे बाद नसता तरी विकेटकीपरच्या एंडला देखील तो बाद होता, हे स्पष्ट झाले.
What just happened?! Jake Weatherald somehow got run out at both ends, on the same ball! ????
A @KFCAustralia Bucket Moment | #BBL10 pic.twitter.com/eLRurkBQtp
— KFC Big Bash League (@BBL) January 24, 2021
दरम्यान, सामन्याबाबत बोलायचे झाल्यास हा सामना अॅडलेड स्ट्रायकर्सने सहा धावांनी जिंकला. या सामन्यात अॅडलेड स्ट्रायकर्सने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १५९ धावांची मजल मारली होती. त्याच्या प्रत्युतरात सिडनी थंडर्सचा संघ निर्धारित २० षटकात ७ बाद १५३ धावाच करू शकला. अॅडलेड स्ट्रायकर्सकडून ४ षटकात २२ धावा देऊन २ बळी घेणाऱ्या पीटर सिडलला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
महत्वाच्या बातम्या:
लवकरच भारतात येतोय! बेन स्टोक्सने ट्विटरवर पोस्ट करत दिली माहिती, फोटो होतोय व्हायरल






