---Advertisement---

भारतीय हॉकी संघाने उडवला न्युझीलंडचा धुव्वा, पहिल्या कसोटी सामन्यात ४-२ ने विजय

---Advertisement---

बेंगलोर | भारतीय हॉकी संघाने गुरुवारी (१९ जुलै) तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील, पहिल्या सामन्यात न्युझीलंडवर ४-२ ने विजय मिळवला.

या सामन्यात भारताकडून रुपिंदर पाल सिंगने दोन तर मनदीप  सिंग आणि हरमनप्रीत सिंगने प्रत्येकी एक गोल केला.

न्युझीलंडकडून एकट्या स्टीफन्स जेनेसला दोन गोल करण्यात यश आले.

सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला भारताला पेनाल्टी कॉर्नर मिळाला यावर रुपिंदर पाल सिंगने भारताला आघाडी मिववून दिली.

त्यानंतर १५ व्या मिनिटाला भारताच्या मनदीप सिंगने दुसरा गोल करत भारताची आघाडी २-० ने वाढवली.

न्युझीलंडकडून २६ व्या  मिनिटाला स्टीफन्स जेनेसने पहिला गोल केला.

३४ व्या मिनिटाला भारताला मिळालेल्या आणखी एका पेनाल्टी कॉर्नरचा फायदा उठवत रुपिंदर पाल सिंगने तिसरा गोल केला.

त्यानंतर ३८ व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगने भारतासाठी चौथा गोल केला.

तर सामन्याच्या शेवटी न्युझीलंडच्या स्टीफन जेनेसने आक्रमक खेळ करत दुसरा गोल केला.

भारताच्या या विजयाचा शिल्पकार रुपिंदर पाल सिंग राष्ट्रकुल स्पर्धेनंतर प्रथमच भारतीय संघात समाविष्ट झाला होता. आपल्या पुनरागमनाच्या सामन्यात  रुपिंदर पाल सिंगने दमदार कामगिरी करत भारताला या मालिकेत १-० ने आघाडी मिळवून दिली.

महत्त्वाच्या बातम्या-

-रशिद खान म्हणतो, कृणाल आपणही हे करायला हवे

-Video: कर्णधार विराट कोहलीने केले टीम इंडियाच्या चाहतीला खुश!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment