महिला हॉकी आशिया चषक २०२२ (ashia cup 2022) स्पर्धेत भारतीय महिला हॉकी (indian womens hockey team) संघाने कांस्य पदक पटकावले आहे. भारत आणि चीन यांच्यात या पदकासाठी सामना झाला. ज्यामध्ये भारताने बाजी मारून पदक मिळवले. भारताने या सामन्यात २-० अशा फरकाने चीनचा पराभव केला आणि स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवला.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये चौथ्या स्थानासह २०२० मध्येही यश मिळवलेल्या, भारतीय संघाला अलिकडच्या काळात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जास्त सराव करण्याची संधी मिळाली नाही. दरम्यानच्या काळात संघाने जास्त सामनेही खेळले नाहीत. याच कारणास्तव भारतीय महिला हॉकी संघाला त्यांच्या महत्वाच्या सामन्यांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करता आली नाही. अशात आशिया चषकातही संघाला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले आहे.
चीनविरुद्धच्या या सामन्यात सुरुवातीपासूनच भारतीय संघाने वर्चस्व निर्माण केले होते. भारतीय संघाला त्यांचा पहिला गोल सामन्याच्या १३ व्या मिनिटात मिळाला होता. पहिला गोल शर्मिला देवीने पेनल्टी कॉर्नरवरून केला. पहिल्या गोलंनंतर चीनच्या संघाने स्वतःला सावरलेही नव्हते, तेवढ्यात भारतीय संघाने दुसरा गोल केला. यावेळी हा गोल गुरजीत कौरने केला आणि हा देखील पेनल्टी कॉर्नरमधूनच आला होता. यानंतर सामन्यात भारतीय संघाने घेतलेली आघाडी शेवटपर्यंत तशीच राहिली आणि चीनला एकही गोल करता आला नाही. परिणामी भारताने सामना २-० ने जिंकला.
The ???? medal comes home! ????????
Not the end we envisioned, but, nonetheless, a fighting display from our #TeamInBlue and we end the tournament on a high! ????????????#IndiaKaGame #WAC2022 pic.twitter.com/bBBvsXC5V5
— Hockey India (@TheHockeyIndia) January 28, 2022
दरम्यान, या हॉकी स्पर्धेची सुरुवात भारतासाठी चांगली राहिली. पहिल्या सामन्यात भारताने मलेशियाला ९-० ने पराभूत केले होते. त्यानंतर जपानकडून भारताला ०-२ असा पराभव पत्करावा लागला. पण पुढच्या सामन्यात भारताने पुन्हा एकदा विजय मिळवला. यावेळी भारताने सिंगापूरवर ९-१ असा मोठा विजय मिळवला आणि उपांत्य सामन्यात प्रवेश केला होता. परंतु उपांत्य सामन्यात केलेल्या खराब बचाव केला आणि पेनल्टी कॉर्नरचे रुपांतर गोलमध्ये करायला जमले नाही. याच कारणास्तव कोरीयाकडून उपांत्य सामन्यात संघाला २-३ असा पराभव मिळाला.
Just the performance we wanted to see????
Great game for #TeamIndia as they clinch the ???? Medal and put in a perfect finish to their last game of the tournament????
???????? 2:0 ????????#IndiaKaGame #WAC2022 pic.twitter.com/SwBI0V786a
— Hockey India (@TheHockeyIndia) January 28, 2022
जागतिक क्रमवारीवर नजार टाकली, तर भारतीय संघ चीनवर नेहमीच भारी पडल्याचे दिसते. भारतीय संघ क्रमवारीत १० व्या क्रमांकावर आहे, तर चीन मात्र १३ व्या क्रमांकावर आहे. भारताने आतापर्यंत चीनला चार सामन्यांपैकी तीन मध्ये पराभूत केले आहे, तर एक सामना अनिर्णीत राहिला होता.
महत्वाच्या बातम्या –
‘लखनऊ संघाचे माझ्यासाठी किती बजेट?’, शार्दुलने विचारलेल्या प्रश्नावर केएल राहुलने दिले ‘हे’ उत्तर
अन् स्टिव्ह स्मिथने स्वत:वरच मीम बनवत नामकरणही केले, ‘त्या’ इंस्टाग्राम पोस्टमागचा हेतू तरी काय?
व्हिडिओ पाहा –






