Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हॉकी: लॉयला, सेंट जोसेफ अंतिम फेरीत

हॉकी: लॉयला, सेंट जोसेफ अंतिम फेरीत

November 21, 2022
in T20 World Cup, क्रिकेट, टॉप बातम्या
File Photo

File Photo


पुणे: लॉयला आणि सेंट जोसेफ प्रशाला संघांनी येथे सुरु असलेल्या दुसऱ्या फादर शॉक स्मृती आंतरशालेय हॉकी स्पर्धेत १४ आणि १७ वर्षांखालील गटातून अंतिम फेरी गाठली. नेहरुनगर येथील मेजर ध्यानंचद मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत १४ वर्षांखालील गटात लॉयला प्रशाला संघाने वेदांशू दिसलेच्या ४३व्या मिनिटातील एकमात्र गोलच्या जोरावर सेंट पॅट्रिक प्रशाला संघाचा १-० असा पराभव केला.

दुसऱ्या सामन्यात सेंट जोसेफ मुलांच्या प्रशालेने ज्योती इंग्लिश प्रशाला संघाचा १४-० असा धुव्वा उडवला. निलकांत देसलेने चार, तर दर्शन राठोडने तीन गोल करून विजयात महत्वाची भूमिका बजावली. धुर्या शहा, अथर्व गोयल, आर्य यादवने प्रत्येकी दोन, शौर्य डोंगरे, स्वरद कांबळेने प्रत्येकी एक गोल केला. स्पर्धेतील १७ वर्षांखालील गटात लॉयला प्रशाला संघाने आयन पागेदारने नोंदवलेल्या पाच गोलच्या जोरावर मॉडर्न प्रशाला संघाचा ७-३ असा पराभव केला. केतन कदम आणि स्वाज खिलारेने एकेके गोल केला. मॉडर्नकडून श्रेयस मुसळेने एक, तर संचित मुसळेने दोन गोल केले.

दुसऱ्या सामन्यात सेंट जोसेफ प्रशाला संघाने सेंट उर्सुलाचा ७-० असा पराभव केला. अजिंक्य नाईकनवरेने चार, विपुल कुंडगरने दोन, तर अफ्फान मुल्लाने एक गोल केला.

निकाल –
उपांत्य फेरी (१४ वर्षांखालील)
लॉयला प्रशाला १ (वेदनाशु देसले ४८वे मिनिट) वि.वि. सेंट पॅट्रिक प्रशाला ० मध्यंतर ०-०

सेंट जोसेफ प्रशाला १४ (दर्शन राठोड, १, १७, ४९वे मिनिट, धुर्य शहा ६, ४१वे मिनिट, अथर्व गोयल ११, २१वे मिनिट, शौर्य डोंगरे १४वे मिनिट, आर्य यादव १९वे मिनिट, , निळकंठ देवळे २२, २४, ३९वे मिनिट, स्वरद कांबळे ४७वे मिनिट) वि.वि. ज्योती इंग्लिश स्कूल ० मध्यंतर ०-०

१७ वर्षांखालील (उपांत्य फेरी) सेंट जोसेफ मुलांची प्रशाला ९ (विपुल कुंडगर ८, ३८वे मिनिट, अफ्फान मुल्ला १८वे मिनिट, अजिंक्य नाईकनवरे २२, २४, ४०, ४८वे मिनिट) वि.वि. सेंट उर्सुला ०

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
FIFA WORLD CUP: पहिल्याच सामन्यात इंग्लंडचा धमाका; इराणचा 6-2 ने उडवला धुव्वा
पूरनची हकालपट्टी? वेस्ट इंडीजला मिळणार नवा कर्णधार; आयपीएल गाजवलेल्या खेळाडूला मिळू शकते जबाबदारी


Next Post
Nicholas-Pooran

ब्रेकिंग: पराभवाची जबाबदारी घेत पूरनने दिला वेस्ट इंडिज संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा

Steve-Smith-And-David-Warner

'मी गुन्हेगार नाहीये...', चेंडूशी छेडछाड प्रकरणात अडकलेल्या दिग्गज ऑस्ट्रेलियन खेळाडूचे मोठे वक्तव्य

File Photo

आरसीबीसी हॅन्डीकॅप स्नुकर स्पर्धेत पंकज सहानी, अजिंक्य वाडिया, मझहर ताहेरभॉय, अयान खान यांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143