Sunday, January 29, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ब्रेकिंग: पराभवाची जबाबदारी घेत पूरनने दिला वेस्ट इंडिज संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा

November 21, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
Nicholas-Pooran

Photo Courtesy: Twitter/ICC


ऑस्ट्रेलियात नुकत्याच पार पडलेल्या टी20 विश्वचषकात दोन वेळच्या विजेत्या वेस्ट इंडीज क्रिकेट संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. संघाला विश्वचषकाच्या पात्रता फेरीतूनच बाहेर पडावे लागले होते. या पराभवानंतर संघाचा कर्णधार निकोलस पूरन यांनी जबाबदारी घेत आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने याबाबत अधिकृत माहिती दिली.

BREAKING: Nicholas Pooran steps down as the T20I and ODI Captain of the West Indies Senior Men's Team.

More below:https://t.co/HbO2Le1ajB

— Windies Cricket (@windiescricket) November 21, 2022

 

वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,

‘निकोलस पूरनने वेस्ट इंडीजच्या टी20 व वनडे संघाचा कर्णधार म्हणून राजीनामा दिला आहे. त्याने दिलेल्या सेवेबद्दल आम्ही त्याचे आभार मानतो.’

आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा देताना पूरन म्हणाला,

“विश्वचषकातील संघाच्या खराब कामगिरीची जबाबदारी घेत मी खूप विचारपूर्वक संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्यावर विश्वास दाखवणाऱ्या वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाला मी धन्यवाद यापुढे देखील मी संघाला एक वरिष्ठ खेळाडू म्हणून आपली सेवा देण्यासाठी उत्सुक आहे.”

कायरन पोलार्डने निवृत्ती घेतल्यानंतर पूरनकडे‌ मे महिन्यात मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व दिले गेले होते.

टी20 विश्वचषकात वेस्ट इंडिज संघ अपेक्षाप्रमाणे कामगिरी करू शकला नव्हता. 2012 व 2016 टी20 विश्वचषकाचे विजेते असलेल्या संघाला पात्रता फेरीचा अडथळा देखील पार करता आला नाही. त्यामुळे केवळ वेस्ट इंडीजच नव्हेतर जगभरातील चाहत्यांची निराशा झालेली. वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने देखील याची गंभीर दखल घेतली आहे. वेस्ट इंडीज संघाच्या खराब कामगिरीनंतर बोर्डाने या कामगिरीची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठीत केली आहे. यामध्ये वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार ब्रायन लारा, संघाचे नवनियुक्त प्रशिक्षक मिकी आर्थर व एका वरिष्ठ न्यायमूर्तींचा समावेश आहे.

(Nicholas Pooran Steps Down As The West Indies Limited Overs Captain)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘भारतीय म्हणतात दिग्गज, पण आपलेच काढतात इज्जत’, पाकिस्तानच्या माजी दिग्गजाचे दु:ख आले बाहेर
अरुणाचल प्रदेशची असामान्य कामगिरी! लिस्ट ए क्रिकेटमध्ये रचला जगात कुणालाच न जमलेला विक्रम  


Next Post
Steve-Smith-And-David-Warner

'मी गुन्हेगार नाहीये...', चेंडूशी छेडछाड प्रकरणात अडकलेल्या दिग्गज ऑस्ट्रेलियन खेळाडूचे मोठे वक्तव्य

File Photo

आरसीबीसी हॅन्डीकॅप स्नुकर स्पर्धेत पंकज सहानी, अजिंक्य वाडिया, मझहर ताहेरभॉय, अयान खान यांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

File Photo

टाटा महा ओपन 14 वर्षांखालील चॅम्पियनशिप सिरिज 2022 स्पर्धेत आदिती सागवेकर, सृष्टी सूर्यवंशी, मिशिका तायडे यांची आगेकूच

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143