हॉकी ओडिशा, उत्तर प्रदेश हॉकीमध्ये किताबी झुंज

औरंगाबाद। हॉकी ओडिशा आणि उत्तर प्रदेश हॉकी हे संघ नवव्या राष्ट्रीय ज्युनियर हॉकी स्पर्धेच्या किताबी लढतीत आमने सामने उभे ठाकणार आहेत. गुरुवारी झालेल्या सामन्यांमध्ये उत्तर प्रदेश हॉकीने हॉकी हरियाणाला मात देत स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले. हॉकी ओडिशानेही आठव्यांदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

गतवर्षी उपविजेता राहिलेल्या हॉकी हरियाणा संघाला 4-0 च्या फरकाने पराभुत करुन उत्तर प्रदेश हॉकीच्या संघाने स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. शिवम आनंद या उपांत्य फेरीच्या सामन्याचा नायक ठरला. त्याने 48, 25 आणि 58 व्या मिनीटांत दणदणीत गोल करत विजयाचा कळस चढवला होता. त्यापुर्वी अजय यादवने 26 व्या मिनीटांत उत्तरप्रदेस हॉकी संघासाठी गोलचे खाते उघडले होते. पहिल्या सत्रात आघाडीवर असलेल्या उत्तरप्रदेश हॉकी संघाचा दबदबा कायम राखत दिमाखात सामना पटकावला.

पहिल्या उपांत्येफेरीच्या सामन्यात हॉकी ओडिशाला विजयासाठी मध्यप्रदेश हॉकी अकादमी विरोधात संघर्ष करावा लागला. एकही गोल न झाल्याने निर्धारित वेळेत सामना निकालात निघाला नाही. मात्र शुट आऊटमध्ये गेलेल्या या सामन्यात हॉकी ओडिशाने 4-2 च्या फरकाने विजय साकारत अंतिम फेरीत प्रवेश केला. चौथ्या क्‍वॉर्टरमध्ये हॉकी ओडिशाला सामन्यादरम्यान दोनवेळा गोल करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश आले नाही. अवघ्या काही इंचांहुन भिमा एक्काने सरकवलेला चेंडू गोलपोस्टमध्ये जाता जाता राहिला. त्यानंतर सुभाष बार्लानेही आलेल्या संधीचे सोने केले नाही.

शुटआऊटमध्ये गेलेल्या या सामन्यात हॉकी ओडिशाकडुन प्रकाश धीर, लभन लुगन, सुनित लाक्रा, कृष्णा तिर्की यांनी गोल केले, तर मध्य प्रदेशकडुन विकास रजाक, आदर्श हर्दुआ यांनी संधी गमावली.

निकाल :

पहिली उपांत्य फेरी : हॉकी ओडिशा : 0,4 (प्रकाश धीर, लबन लुगान, सुनित लाक्रा, कृष्णा तिर्की) वि. वि. मध्यप्रदेश हॉकी अकादमी 0,2 (हैदर अली, सुंदरम राजावत). हाफटाईम : 0-0

दुसरी उपांत्य फेरी : उत्तरप्रदेस हॉकी : 3 (अजय यादव 26 मि., शिवन आनंद 48 मि., 52 मि., 58 मि.) वि. वि. हॉकी हरियाणा : 0 हाफटाईम 1-0

You might also like