भुवनेश्वर। कलिंगा स्टडियमवर पार पडलेल्या १४व्या हॉकी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात बेल्जियमने नेदरलॅंड्सला पेनल्टी शूटआऊटमध्ये ३-२ असे पराभूत करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. तर नेदरलॅंड्सला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
बेल्जियमचे हे पहिलेच विश्वविजेतेपद असून नेदरलॅंड्सनेही तीन वेळा विजेतेपद पटकावले आहे. याचबरोबर बेल्जियमने जागतिक क्रमवारीत पहिले स्थान काबिज केले आहे.
उपांत्य फेरीत गेतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभूत करणाऱ्या नेदरलॅंड्सचे मनोबल वाढले होते. दोन्ही संघांनी आक्रमकपणेच सामन्याला सुरूवात केली. सामन्याच्या 2ऱ्याच मिनिटाला गॉगनार्ड सिमॉनने खेळलेला शॉट जरा दूरवर गेल्याने बेल्जियमची आघाडी घेण्याची संधी मुकली. तर सातव्या मिनिटाला नेदरलॅंड्सचा हर्ट्सबर्गरचा शॉटही चुकला.
दोन्ही संघांमध्ये गोल आघाडी घेण्यासाठी चढाओढ सुरू होती. पण पहिल्या सत्रात एकाही संघाला गोल करण्यात यश आले नाही. दुसरे सत्र संपत आले असतानाही एकही गोल झाला नाही. या सत्रात नेदरलॅंड्सला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाल्या होत्या. मात्र बेल्जियमच्या वॅनस्च विन्सेंट आणि सिमॉन या बचावफळीपुढे ते अपयशी ठरले. तसेच बेल्जियमनेही काऊंटर अटॅक करण्याचे प्रयत्न केले पण ते सफल झाले नाही.
दोन्ही संघांचे चेंडूवर सारखेच वर्चस्व होते. तर त्यांची मिडफिल्डही समानच कामगिरी करत होती. एकमेकांची बचावफळी मोडण्यात कोणालाच यश येत नव्हते.
शेवटच्या सत्रात हर्ट्सबर्गरने पेन्लटी सर्कलमध्ये प्रवेश केला पण तो ही प्रयत्न यशस्वी झाला नाही. सामन्याचे ६० मिनिटे पूर्ण झाली असता एकही गोल न झाल्याने पेनल्टी शूटआऊट झाले. यामध्ये बेल्जियमचा वॅन डोरेन आर्थरचा शॉट मुकला तर नेदरलॅंड्सकडून हर्ट्सबर्गरचा शॉट अचूक लागला यामुळे ते १-० असे आघाडीवर होते.
डेनायर फेलीक्सचा पण शॉट चुकल्याने बेल्जियम १-० असे पिछाडीवरच होते. तर नेदरलॅंड्सचाही दुसरा शॉट चुकल्याने सामना १-० असा राहिला. मात्र डी जोनसचा चेंडू नेटमध्ये गेल्याने नेदरलॅंड्सला २-० अशी आघाडी मिळाली.
वॅन युबेल फ्लोरेंटचा शॉट गोलकिपरला चकवत नेटमध्ये गेल्याने बेल्जियमचा पहिला गोल झाला. तर वेगनेझ विक्टरचाही शॉट नेटमध्ये गेल्याने सामना २-२ असा बरोबरीत राहिला. पाच संधीचा हा पेनल्टी शूटआऊट बरोबरीत सुटल्याने तो परत सुरू ठेवण्यात आला.
यामध्ये फ्लोरेंटचा शॉट नेटमध्ये बरोबर गेल्याने बेल्जियमने त्यांचे पहिल्या विश्वविजेतेपदावर नाव कोरले. तर तीन वेळेच्या विश्वविजेत्या संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
तसेच आर्थरला या फॅन्स चॉइसचा पुरस्कार मिळाला.
महत्त्वाच्या बातम्या:
–हॉकी विश्वचषक २०१८: गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला मानावे लागले कांस्य पदकावर समाधान
–‘हे कधी, केव्हा आणि कशासाठी ?’, हरभजनचा सायमंड्सला प्रश्न
–कोणत्याच भारतीय कर्णधाराला न जमलेली गोष्ट विराट कोहलीने करुन दाखवली