fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

हॉकी विश्वचषक २०१८: गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला मानावे लागले कांस्य पदकावर समाधान

भुवनेश्वर। १४व्या हॉकी विश्वचषकात आज (१६ डिसेंबर) गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने कांस्यपदकाच्या लढतीत इंग्लंडला ८-१ असे पराभूत केले. विजेतेपदाची हॅट्ट्रीक करण्याच्या हेतूने आलेल्या ऑस्ट्रेलियाला उपांत्यफेरीत नेदरलॅंड्सकडून पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-३ असे पराभूत व्हावे लागले होते.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून टॉम क्रेगने हॅट्ट्रीक करत तीन, हेवर्ड जेरेमीने दोन तर गोवर्स ब्लेक, मिटन ट्रेंट आणि गोवर्स ब्लेक यांनी प्रत्येकी एक गोल केला. इंग्लंडकडून बॅरी मिडलटनला गोल करण्यात यश आले.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने आक्रमक सुरूवात केली. त्यांनी तब्बल २७ वेळा पेनल्टी सर्कलमध्ये प्रवेश केला. तर त्यांना एकूण ५ पेनल्टी कॉर्नर मिळाल्या.

सामन्याच्या ६व्यात मिनिटाला ऑस्ट्रेलियाला पेनल्टी कॉर्नर मिळाली. मात्र ब्लेककडून गोल करण्याची संधी थोडक्यात मुकली.

८व्या मिनिटाला टॉमने ब्लेकला चेंडू पास केला. त्याने ऑस्ट्रेलियाकडून पहिला गोल केला. त्याच्या पुढच्याच मिनिटाला टॉमने परत एक गोल करत संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली.

इंग्लड संघाला देखील गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या. मात्र ऑस्ट्रेलियाचा गोलकिपर टेलर लॉवेलने त्यांचे प्रयत्न अपयशी ठरवले. १९व्या मिनिटाला टॉम आणि ब्लेकने काऊंटर अटॅक करत टॉमने तिसरा गोल केला. पहिले सत्र संपले असता ऑस्ट्रेलिया ३-० अशी आघाडीवर होती. त्यांचेच चेंडूवर वर्चस्व होते. तसेच त्यांनी गोल करण्यासाठी सहा शॉट्स मारले.

दुसऱ्या सत्रात दोन्ही संघांनी बरोबरीचा खेळ केल्याने या सत्रात एकही गोल झाला नाही. तर इंग्लंडने तिसऱ्या सत्राच्या पहिल्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळवली. मात्र ऑस्ट्रेलियाचा गोलकिपर अॅंड्र्यू चार्टर आणि बचावफळीने ल्युक टेलरला आघाडी घेण्यापासून रोखले.

३२व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाला पेनल्टी कॉर्नर मिळाली. ब्लेकच्या त्या शॉटला गोलकिपरने अडवले मात्र ट्रेंटने तो गोल करत संघाला ४-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. ३४व्या मिनिटाला ट्रेंटने पास केलेला चेंडूवर टीमने संघासाठी पाचवा गोल केला. तर काही सेंकदाच्या फरकाने टॉमने या सामन्यातील त्याची हॅट्ट्रीक पूर्ण केली.

ऑस्ट्रेलियाच्या मारापुढे इंग्लंडच्या गोलकिपरने हार पत्करली होती. त्यात ४५व्या मिनिटाला इंग्लंडला गोल करण्याची संधी मिळाली. कर्णधार फिल रोपरच्या पासवर बॅरी संघासाठी गोलचे खाते उघडले. तरीही तिसरे सत्र संपले असता ऑस्ट्रेलियाच ६-१ अशी मोठ्या आघाडीवर होती.

शेवटच्या सत्रातही ऑस्ट्रेलियाचे हल्ले सुरूच होते. या सत्रात त्यांच्याकडून जेरेमीने दोन गोल करत संघाचा विजय पक्का केला. हे गोल त्याने पेनल्टी कॉर्नरवर केले.

२०१३पासून या दोन संघामध्ये १० सामने झाले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलिया ७ सामने जिंकत आघाडीवर आहे.तर इंग्लंड दोनच सामने जिंकला आहे.

जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असणाऱ्या ऑस्ट्रेलियाचे हे हॉकी विश्वचषकातील दहावे पदक आहे. त्यांनी तीन सुवर्ण (१९८६, २०१०, २०१४), दोन रौप्य (२००६,२००७) आणि पाच कांस्य (१९७८, १९८२, १९९०, १९९४, २०१८) मिळवले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

पीव्ही सिंधूची ऐतिहासिक सुवर्णमय कामगिरी

यष्टीरक्षक रिषभ पंतने फक्त २ सामन्यात घेतले तब्बल १५ झेल

‘हे कधी, केव्हा आणि कशासाठी ?’, हरभजनचा सायमंड्सला प्रश्न

You might also like