भुवनेश्वर। 14 व्या हॉकी विश्वचषकाला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील चौथा सामना हा न्यूझीलंड विरुद्ध फ्रान्स संघात भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडियममध्ये रंगणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल.
हे दोन्ही संघ अ गटामध्ये असून साखळी फेरीतील त्यांचा हा पहिलाच सामना आहे. या स्पर्धेत न्यूझीलंडचा संघ टरंट ब्लेरच्या नेतृत्वाखाली तर चारलेट विक्टरच्या नेतृत्वाखाली फ्रान्सचा संघ खेळणार आहे.
या दोन संघ 2013 पासून 2 वेळा आमने सामने आले आहेत. त्यातील एक सामना बरोबरीचा तर एक सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवला आहे.
जागतीक क्रमवारीत 9 व्या क्रमांकावर असणाऱ्या न्यूझीलंडने 1976 च्या आॅलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवले आहे. मात्र त्यानंतर त्यांची खास कामगिरी झालेली नाही. 2012 च्या आॅलिम्पिकमध्ये ते नवव्या तर 2016 च्या आॅलिम्पिकमध्ये सातव्या क्रमांकावर होते.
तसेच त्यांनी या विश्वचषकात सामील होण्याआधी मलेशिया विरुद्ध तीन सराव सामने खेळले आहेत. यातील पहिल्या दोन सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे. तर शेवटच्या सामन्यात पराभव स्विकारला आहे.
न्यूझीलंड संघाच्या बचाव फळीत स्टीफन जेनेस, ह्यूगो इंग्लिस आणि मार्क्यूस चिल्ड्स हे हॉकीपटू आहेत. तर मागील आठवड्यात 100 वा आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला जारेद पंचिया फ्रंटला खेळेल. तसेच त्याचा भाऊ अरुण पंचियाही त्यांच्या संघात आहेत.
त्याचबरोबर फ्रान्स 28 वर्षांनतर विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत. त्यामुळे त्यांच्या कामगिरीकडे लक्ष राहिल. तसेच त्यांच्या संघातील कर्णधार चारलेट विक्टर ड्रॅग फ्लिकचा फटका न्यूझीलंडसाठी धोकादायक ठरु शकतो. ह्यूगो आणि टॉम हे जेनस्टेट बंधू या मिल्डफिल्डर खेळाडूंवर तर पेनल्टी कॉर्नर स्पेशालिस्ट असणारा विक्टर चार्ल्सवर चांगल्या कामगिरीची जबाबदारी असेल.
या सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट नेटवर्क आणि दूरदर्शनवर होणार आहे.
असे आहेत संघ:
न्यूझीलंड- टरंट ब्लेर(कर्णधार), बेननेट कॉरी, स्टीफन जेनेस, ह्यूगो इंग्लिस, मार्क्यूस चिल्ड्स, एनरसन जॉर्ज (गोलकीपर), जॉयस रिचर्ड (गोलकीपर), लेट डेन, मूइर जॉर्ज, न्यूमॅन डॉमिनिक, अरुण पंचिया, जारेद पंचिया, फिलिप्स हेडन, रॉस निक, रसल केन, सारीकाया एडेन, वूड्स निक, मॅक्लेसे शेआ.
फ्रान्स- चारलेट विक्टर (कर्णधार), विक्टर चार्ल्स, बामगर्टन गॅस्पर्ड, ब्रॅन्की मॅक्सिमिलियन, क्लेमेंट टिमोथी, कोसिने एरिस्टाइड, डॅमंट निकोलस, जीन-बॅप्टिस्ट फर्ग्युस, ह्यूगो जेनस्टेट टॉम जेनस्टेट, गोएत फ्रान्कोइस, लॉकवुड व्हिक्टर, मॅसन चार्ल्स, पेटर्स-डीयूट्झ क्रिस्टोफोरो, रॉगेयू ब्लेज, सौनियर कोरेन्टिन(गोलकिपर), थिफ्री आर्थर (गोलकिपर), टायनेवेझ इतियेन, वॅन स्ट्रॅटन पीटर.
महत्त्वाच्या बातम्या:
–हॉकी विश्वचषक २०१८: आजचा पहिला सामना अर्जेंटिना विरुद्ध स्पेन
–हॉकी विश्वचषक २०१८: पाकिस्तानी क्रिडा पत्रकारांचा व्हिसा नामंजूर