भुवनेश्वर। 14व्या हॉकी विश्वचषकात आज (6डिसेंबर) झालेल्या स्पेन विरुद्ध न्यूझीलंड सामना 2-2 असा बरोबरीत राहिला.
या सामन्यात स्पेनकडून बेलट्रान अल्बर्ट आणि इग्लेसियास अल्वारो तर न्यूझीलंडकडून फिलिप्स हेडन आणि रसल केन यांनी गोल केले.
एक विजय आणि एक बरोबरीचा सामना यामुळे स्पेनने आज सावध सुरूवात केली. पहिल्या सत्रात उत्तम खेळ करत त्यांनी पहिला गोल केला. अल्बर्टने 9व्या मिनिटालाच गोल करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.
न्यूझीलंडला मात्र मागील सामन्यात अर्जेंटिना विरुद्धचा 0-3 असा पराभव जिव्हारी लागल्याने त्यांनी आक्रमक खेळाला सुरूवात केली. त्यांच्याकडून स्टीफन जेनेसने गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले मात्र स्पेनचा गोलकिपर कोरतेज किंक्कोे ते हल्ले रोखण्यात यशस्वी झाला.
पहिल्या सत्रात 1-0 अशी आघाडी मिळवल्याने स्पेनने दुसऱ्या सत्रातही चेंडूवर वर्चस्व कायम ठेवत उत्तम खेळ केला. तर पुन्हा एकदा त्यांना न्यूझीलंडची बचावफळी मोडण्यात यश आले. अल्वारोने 27व्या मिनिटाला गोल करत सामना 2-0 असा पुढे नेला.
2-0 असे मागे असताना न्यूझीलंडच्या खेळाडूंनी तिसऱ्या सत्रात त्यांचे प्रयत्न सुरूच ठेवले. पण यावेळी त्यांना गोल करण्याच्या कमी संधी मिळाल्या तसेच स्पेनची बचावफळी मोडण्यात सतत अपयशही येत होते.
हेडनने मात्र चौथ्या सत्रात अप्रतिम खेळ करत न्यूझीलंडचे गोलचे खाते उघडले. त्याने किंक्कोेला चकवत 50व्या मिनिटाला हा गोल केला. पहिल्या गोलमुळे न्यूझीलंडच्या संघात परत जीव आला.
तसेच न्यूझीलंडनी सामना बरोबरीत आणण्याचे प्रयत्न करत असताना त्यांना पेनल्टी कॉर्नर मिळाली. सामना संपण्यास 4 मिनिटे बाकी असताना केनने त्या पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करत सामना 2-2 असा बरोबरीत आणला.
न्यूझीलंडचे 3 सामन्यात 4 गुण झाले असून ते अ गटातील गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहेत. जर त्यांना हे स्थान कायम ठेवायचे असेल तर आज अर्जेंटिनाला फ्रान्स विरुद्ध विजय मिळवणे आवश्यक आहे.
तसेच फ्रान्सने अर्जेंटिना विरुद्धचा सामना जिंकला किंवा 5 गोल फरकाने अनिर्णीत राहिला तर स्पेन या स्पर्धेच्या बाहेर जाऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या:
–कसोटीमध्ये तब्बल ८२ वर्षानंतर घडला हा पराक्रम
–आयपीएल चाहत्यांना मोठा धक्का, २०१९च्या आयपीएलमध्ये दिसणार नाही ही ऑस्ट्रेलियाची स्फोटक जोडी
–वाढदिवस विशेष: भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाबद्दल या खास १० गोष्टी माहित आहेत का?