fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

कसोटीमध्ये तब्बल ८२ वर्षानंतर घडला हा पराक्रम

अबुधाबी। पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सोमवारपासून (3 डिसेंबर) तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानचा गोलंदाज यासिर शहाने त्याचा विकेट्सचा धडाका कायम ठेवत आज (6डिसेंबर) अजून एक पराक्रम केला आहे.

या सामन्यात शहाने कसोटीमध्ये जलद 200 विकेट्स घेण्याचा 82 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे. हा पराक्रम त्याने न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी केला आहे. त्याने 33 कसोटी सामन्यात 200 घेतल्या आहेत. तर न्यूझीलंड विरुद्धच्या तीन कसोटी सामन्यात 22 विकेट्स घेतल्या आहेत.

शहाने जलद 200 विकेट्स घेताना ऑस्ट्रेलियाच्या सीव्ही ग्रीमेट यांचा1936 मध्ये केलेला विक्रम मोडला आहे. ग्रीमेट यांनी 36 कसोटी सामने खेळताना 200 विकेट्स घेतल्या होत्या. हा कारनामा त्यांनी दक्षिण आफ्रिके विरुद्ध केला होता.

तसेच याआधी शहाने न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीमध्ये 10 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. असा करणारा तो 1945नंतरचा जगातील चौथाच गोलंदाज ठरला आहे.

कसोटीमध्ये जलद 200 विकेट्स घेणारे गोलंदाज-

33 सामने – यासिर शहा (पाकिस्तान)

36 सामने – सीव्ही ग्रीमेट (ऑस्ट्रेलिया)

37 सामने – आर अश्विन (भारत)

38 सामने – डेनिस लिली (ऑस्ट्रेलिया), वकार युनूस (पाकिस्तान)

39 सामने – डेल स्टेन (दक्षिण आफ्रिका)

महत्त्वाच्या बातम्या:

कसोटीत या गोलंदाजाने रोहित शर्माची घेतली आहे सर्वाधिक वेळा विकेट

तीन धावांवर बाद होऊनही कर्णधार कोहलीने केला हा खास पराक्रम

वाढदिवस विशेष: भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाबद्दल या खास १० गोष्टी माहित आहेत का?

You might also like