---Advertisement---

लखनऊ- बेंगलोर सामन्यात पाहायला मिळणार यो यो हनी सिंगची झलक! कशी ती पाहा ‘या’ व्हिडिओत

On: बुधवार, मे 25, 2022 6:55 PM
Honey-Singh
---Advertisement---

मुंबई। रॅपर आणि संगीतकार यो यो हनी सिंग हा आजकाल खूपच चर्चेत आहे. याचं कारण आहे काही दिवसांपूर्वी आलेलं त्याचं गाणं. मात्र आजचा नवाच चर्चेचा विषय आहे, त्यांचं क्रिकेटप्रेम, विशेषत: आयपीएल प्रेम. हनी सिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगात व्हायरल होत आहे.

या व्हिडिओत हनी सिंग आपल्या चाहत्यांना संदेश देताना म्हणत आहे की, आज संध्याकाळी आयपीएलच्या सामन्यात तो चक्क लाईव्ह परफॉर्म करताना दिसेल. बुधवारी (दि. २५ मे) लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर संघामध्ये महत्वपूर्ण आयपीएल 2022 प्लेऑफ होणार आहे. यादरम्यान हनी सिंग स्टार स्पोर्ट्सवर लाईव्ह असेल.

व्हिडिओमध्ये हनी सिंग चाहत्यांना क्रिकेट लाइव्ह ऑन स्टार स्पोर्ट्स हिंदीमध्ये 25 मे रोजी संध्याकाळी 6:00 वाजता ट्यून करण्यासही सांगत आहेत. यासंदर्भात सोशल मीडियावरही चाहत्यांमध्ये क्रेझ पहायला मिळत आहे. हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की, स्वदेशी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘कू’वर #honeysinghIPL ट्रेंड करू लागला.

हनी सिंगने नुकतेच गायक गुरू रंधावासोबत ‘डिझायनर’ गाणे केले आहे. यात दिव्या खोसला कुमारही दिसले आहे.

चाहते हनी सिंगच्या या व्हिडिओला चांगलीच पसंती देत आहेत.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

धवनला भारताच्या टी२० संघातून वगळण्यामागे राहुल द्रविड आहे कारण? वाचा सविस्तर

‘त्यांच्यामुळेच मी चांगला क्रिकेटर बनू शकलो’, हार्दिकने यशाचे श्रेय दिले ‘या’ तिघांना

“दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है”, मिलरच्या ट्वीटला राजस्थानचा भन्नाट रिप्लाय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---