---Advertisement---

कर्णधार कोहलीला कसोटीत धावा करण्यापासून रोखण्याची आॅस्ट्रेलियाच्या यष्टीरक्षकाने व्यक्त केली आशा

On: सोमवार, नोव्हेंबर 26, 2018 8:08 PM
---Advertisement---

रविवारी (25 नोव्हेंबर) भारताने आॅस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या टी20 सामन्यात विजय मिळवत टी20 मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. भारताच्या या विजयात कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद अर्धशतकाचा मोठा वाटा आहे.

त्याच्या या खेळीबद्दल आॅस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक अॅलेक्य कॅरेने कौतुक करताना कसोटी मालिकेत मात्र त्याला रोखण्यात यश मिळवू अशी आशा व्यक्त केली आहे.

कॅरे म्हणाला, ‘तो खूप चांगला खेळला. शेवटच्या क्षणी तो थोडा दबावात होता. पण त्यांनी पॉवरप्लेमध्ये चांगली सुरुवात केली होती आणि त्यानंतर त्यांना मागे खेचणे आवघड होते. आम्ही त्यांना असे खेळताना आधी पाहिले आहे.’

‘आशा आहे की आम्ही कसोटीत वेगळे काही तरी करु. आमच्याकडे चांगले वेगवान गोलंदाज आहेत आणि नॅथम लिआॅनही आहे. क्रिकेटसाठी हा चांगला मोसम असेल.’

आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात 6 डिसेंबरपासून चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 6 डिसेंबरपासून अॅडलेड येथे सुरु होणार आहे. त्याआधी सिडनीमध्ये 28 नोव्हेंबरपासून चार दिवसीय सराव सामना सुरु होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

धोनीबद्दल विचारताच गांगलीने पाकिस्तानच्या अध्यक्षांना दिले होते हे गमतीशीर उत्तर

सध्या टीकेचा सामना करणाऱ्या हरमनप्रीत कौरचा आयसीसीकडून मोठा सन्मान

कारकिर्दीच्या शिखरावर असताना मलाही मिताली राज प्रमाणे संघातून वगळले- गांगुली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment