---Advertisement---

BREAKING: इंग्लंडला धक्का देत यजमान दक्षिण आफ्रिका टी20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत! फायनलमध्ये देणार ऑस्ट्रेलियाला आव्हान

On: शुक्रवार, फेब्रुवारी 24, 2023 9:50 PM
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका येथे सुरू असलेल्या महिला टी20 विश्वचषकात शुक्रवारी (24 फेब्रुवारी) दुसरा उपांत्य सामना खेळला गेला. यजमान दक्षिण आफ्रिका व इंग्लंड यांच्या दरम्यान झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला थरारक सामन्यात 6 धावांनी पराभूत करत पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली. दक्षिण आफ्रिकेचा अंतिम सामना गतविजेत्या ऑस्ट्रेलियाशी  होईल.

 

केपटाउन येथील न्यूलॅंड्स मैदानावर हा दुसरा उपांत्य फेरीचा सामना खेळला गेला. दक्षिण आफ्रिकेची कर्णधार सुने लूसने फलंदाजीचा निर्णय घेतला. तिचा हा निर्णय संघाच्या दोन्ही सलामीवीर लॉरा वॉल्वर्ट व तझ्मीन ब्रिट्स यांनी योग्य ठरवला. दोघींनी 13.4 षटकात 96 धावा केल्या. लॉरा वॉल्वर्ट 44 चेंडूवर 53 धावा करत बाद झाली झाली. तर,‌ ब्रिट्सने 55 चेंडूवर 68 धावांची खेळी केली. अष्टपैलू मरिझाने कापने 13 चेंडूत नाबाद 27 धावा करत संघाला 164 धावांची मजल मारून दिली.

या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडला देखील पाच षटकात 53 धावांची सलामी मिळाली. मात्र, अनुभवी शबनीम इस्माईलने याच धावसंख्येवर दोन बळी मिळवत संघाला पुनरागमन करून दिले. अनुभवी नॅट सिव्हरने 40 धावा करत इंग्लंडचे आव्हान जिवंत ठेवले. मात्र, त्यानंतर इतर फलंदाज झटपट बाद होत गेले. कर्णधार हिदर नाईट‌ अखेरच्या षटकापर्यंत मैदानावर उभी होती. एका षटकात 13 धावांची गरज असताना नाईट तिसऱ्या चेंडूवर बाद झाल्याने इंग्लंडच्या अपेक्षा संपुष्टात आल्या. परिणामी, संघाला सहा धावांनी पराभव पत्करावा लागला. रविवारी (26 फेब्रुवारी) स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाईल.

(Host South Africa Beat England In 2nd Semifinal Of Womens T20 World Cup 2023)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नेमारची गर्लफ्रेंड आजमावणार बॉलीवूडमध्ये नशीब! गिरवतेय हिंदी आणि कथ्थकचे धडे
आनंदाची बातमी! तिसऱ्या कसोटीत खेळण्यासाठी ‘हा’ ऑस्ट्रेलियन तयार; म्हणाला, ‘मी 100 टक्के फिट…’

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---