भारत आणि न्यूझीलंड यांच्यात बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे वाहून गेला. मात्र दुसऱ्या दिवशी किवी गोलंदाजांनी असा कहर केला की, टीम इंडिया अवघ्या 46 धावांवर ऑलआऊट झाली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडनं 3 गडी गमावून 180 धावा केल्या आहेत. त्यांच्याकडे सध्या 134 धावांची आघाडी आहे. त्यानंतर आता प्रश्न उभा राहतो आहे की, काय भारतीय संघ या सामन्यात कमबॅक करू शकतो का?
न्यूझीलंड विरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यानं आपली रणनीती स्पष्ट केली होती. गंभीर म्हणाला होता की, संघ 100 धावांवर जरी ऑलआऊट झाला, तरी ते आक्रमक क्रिकेट खेळणं सोडणार नाहीत. जर संघ 100 धावांवर बाद झाला, तर गोलंदाज त्या अनुसार परिस्थितीला सांभाळतील. कोच गंभीर सोबतच कर्णधार रोहित शर्मा देखील संघाचं आक्रमक अंदाजात नेतृत्व करताना दिसला आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेली कानपूर कसोटी तुम्हाला आठवतच असेल. या कसोटीचे पहिले 3 दिवस पावसामुळे वाया गेले होते. मात्र त्यानंतर टीम इंडियानं उरलेल्या 2 दिवसांमध्येच सामना संपवला. इंग्लंडचा संघ आजकाल ‘बॅझबॉल’ क्रिकेट खेळतो, मात्र भारतीय संघानं त्यापेक्षाही आक्रमक क्रिकेळ खेळलं. टीम इंडियानं या सामन्यात बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव केला. भारतीय संघानं जर अशाच प्रकारचा खेळ दाखवला, तर ते न्यूझीलंडला पराभूत करू शकतात.
येथे लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, भारतीय संघाकडे खूप सारे विकेट टेकिंग गोलंदाज आहेत. जसप्रीत बुमराह कोणत्याही क्षणी सामन्याची दिशा बदलवू शकतो. याशिवाय रविचंद्रन अश्विनकडे 500 पेक्षा जास्त कसोटी विकेट घेण्याचा अनुभव आहे. तसेच भारतीय संघात कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज सारखे गोलंदाज आहे, जे मोक्याच्या क्षणी विकेट घेण्यास सक्षम आहेत.
हेही वाचा –
काय सांगता! जोफ्रा आर्चरनं 10 वर्षांपूर्वीच केली होती भारत 46 धावांवर ऑलआऊट होण्याची भविष्यवाणी!
IPL 2025; लखनऊ केएल राहुलला रिलीज करणार? मोठे अपडेट समोर
चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी भारत पाकिस्तानमध्ये जाणार? विदेशी मंत्रालयाचे मोठे वक्तव्य!