पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताचा प्रवास 6 पदकांसह संपुष्टात आला. यंदाचा ऑलिम्पिक हा भारतासाठी अतिशय संमिश्र अनुभव होता. भारताला 5 कांस्य आणि 1 रौप्य पदक मिळाले. पण जर आम्ही तुम्हाला सांगितले की भारत 6 नव्हे तर एकूण 12 पदके जिंकू शकला असता? पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला 12 पदके कशी मिळाली असतील असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल? त्यामुळे एका छोट्याशा चुकीमुळे 12 पदके भारताच्या खात्यात कशी येता येता राहिली हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
एकीकडे भारताने 6 पदके जिंकली, तर दुसरीकडे एकूण 6 भारतीय खेळाडू वेगवेगळ्या खेळांमध्ये चौथे स्थान मिळवले, त्यामुळे भारताने एकूण 6 पदके गमावली. नेमबाज मनू भाकरसह भारतीय खेळाडूंनी 25 मीटर पिस्तुल प्रकारात चौथ्या स्थानावर आणि वेटलिफ्टर मीराबाई चानूने एकूण सहा खेळांमध्ये चौथा क्रमांक पटकावला. अशाप्रकारे एकूण 6 पदके प्रत्येकी केवळ एका स्थानाने हुकली.
मनू भाकर- चाैथ्या स्थानी (25 मीटर एअर पिस्तूल)
अर्जून बबूता- चाैथ्या स्थानी (10 मीटर एअर रायफल)
धीरज-अंकिता- चाैथ्या स्थानी (तिरंदाजी)
अनंत जीत-माहेश्वरी- चाैथ्या स्थानी (नेमबाजी)
लक्ष्य सेन- चाैथ्या स्थानी (बॅडमिंटन)
मीराबाई चानू – चाैथ्या स्थानी (वेटलिफ्ट)
50 किलो वजनी गटात महिला कुस्ती स्पर्धेत सहभागी झालेल्या विनेश फोगटचे वजन 100 ग्रॅम जास्त असल्याने तिला अपात्र घोषित करण्यात आले. अपात्र ठरल्यानंतर रौप्य पदकाची मागणी विनेश फोगटने केली होती. विनेश फोगटच्या रौप्य पदकाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. अशाप्रकारे भारताच्या खात्यात अजूनही 7 पदके जमा होऊ शकतात. आता विनेशला पदक मिळते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला एकही सुवर्णपदक मिळवता आले नाही. याआधी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने सुवर्णपदक जिंकले होते. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकासाठी भारताला नीरज चोप्राकडून सर्वाधिक अपेक्षा होत्या, मात्र तो फक्त रौप्यपदकापर्यंत पोहोचू शकला. याशिवाय सुवर्णपदकासाठी पात्र ठरलेल्या विनेश फोगटला 100 ग्रॅम अति वजनामुळे अंतिम फेरीपूर्वीच अपात्र ठरवण्यात आले होते. विनेश सुवर्ण पदक आणण्यासाठी प्रबळ दावेदार दिसत होती.
हेही वाचा-
Paris Olympics: समारोप समारंभ कधी, कोठे किती वाजता; पाहा सगळं काही एका क्लिकवर
Paris Olympics: यंदाच्या ऑलिम्पिक मोहीमेत भारताची इतक्या पदकांची कमाई; सर्वोत्तम कामगिरीत दुसऱ्या स्थानी
ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकणाऱ्या नदीमच्या नावावर बनणार ‘स्पोर्ट्स सिटी’, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा