---Advertisement---

IPL 2024: कसं शक्य आहे! लिलावात मिळाले २० लाख, पण प्रत्यक्ष मिळणार ५० लाख

On: शुक्रवार, डिसेंबर 22, 2023 12:39 PM
Rajat-Patidar
---Advertisement---

मध्य प्रदेशचा युवा फलंदाज रजत पाटीदार याने पार्ल येथील बोलंड पार्क येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले. मात्र, या सामन्यात पाटीदार काही विशेष करू शकला नाही आणि 16 चेंडूत 22 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. पण त्याचा फायदा त्याला आयपीएलमध्ये झाला असून त्याची फी वाढली आहे.

भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा रजत पाटीदार (Rajat Patidar) हा 256 वा खेळाडू ठरला. पदार्पण होताच तो आयपीएलमधील अनकॅप्ड खेळाडू राहिला नाही. अशा परिस्थितीत नियमानुसार त्याची फी 20 लाखांवरून 50 लाख रुपये झाली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) नियमांनुसार, जर एखाद्या अनकॅप्ड खेळाडूने हंगामाच्या मध्यात पदार्पण केले तर बोर्ड त्याची किंमत वाढवते.

पाटीदार आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) कडून खेळतो. आयपीएल 2022 च्या मिनी लिलावात त्याला कोणीही विकत घेतले नाही. अशा स्थितीत लवनीथ सिसोदियाला दुखापत झाल्यानंतर त्याचा बदली खेळाडू म्हणून आरसीबीमध्ये समावेश करण्यात आला. याच मोसमात पाटीदारने एलिमिनेटर सामन्यात शतक झळकावले होते. आयपीएलच्या प्ले-ऑफमध्ये शतक झळकावणारा तो एकमेव अनकॅप्ड खेळाडू आहे.

त्याच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर आयपीएलमध्ये पाटीदारने आतापर्यंत 12 सामन्यात 40.40 च्या सरासरीने 404 धावा केल्या आहेत. या काळात त्याचा स्ट्राइक रेट 144.29 राहिला आहे. त्याच्या टी20 कारकिर्दीत त्याने 37.27 च्या सरासरीने आणि 148.55 च्या स्ट्राइक रेटने 1,640 धावा केल्या आहेत. (How is it possible 20 lakhs in the auction but actually get 50 lakhs)

हेही वाचा

IND vs PAK: ठरलं तर! ‘या’ तारखेला भारत-पाकिस्तान येणार आमने-सामने, खेळणार वर्ल्डकपचा सामना
चुक नडली! उस्मान ख्वाजाला एका चुकीसाठी आयसीसीचा मोठा दंड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---