भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यात जेव्हा कधी सामना होतो तेव्हा संपूर्ण जगाचे लक्ष या सामन्यावर असते. हा जगातील सर्वाधिक पाहिला जाणारा क्रिकेट सामना आहे. लाखो लोक हा सामना मैदानावर पाहतात आणि करोडो लोक हा सामना टीव्ही आणि मोबाईलवर पाहतात. आता पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. जूनमध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकात हा सामना होणार आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिज 2024 मध्ये संयुक्तपणे टी20 विश्वचषक आयोजित करणार आहेत. विश्वचषक स्पर्धेला अजून 6 महिने बाकी आहेत, पण या स्पर्धेचे वातावरण आतापासूनच तयार झाले आहे. या स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अमेरिकेची आर्थिक राजधानी न्यूयॉर्कमध्ये होणार आहे. हा सामना 8 जून किंवा 9 जून रोजी होणार आहे. तारीख अजून ठरलेली नाही पण भारत-पाकिस्तान सामना शनिवारी किंवा रविवारी होणार आहे. मोठी बातमी म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना दिवस-रात्र नसून सकाळी सुरू होणार आहे. अमेरिकेत सकाळी हा सामना आयोजित करण्यामागचा एकमेव उद्देश हा आहे की, भारतातील लोक योग्य वेळी हा सामना पाहू शकतील. जेव्हा अमेरिकेत सकाळ होते तेव्हा भारतात रात्र होते. भारत-पाकिस्तान सामन्याचा सर्वात मोठा चाहतावर्ग या दोन देशांमध्ये आहे, त्यामुळे हा सामना अमेरिकेत दिवसा खेळवला जाईल. टी20 विश्वचषकाच्या इतिहासात भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्या हा पहिल्यांदाच दिवसा खेळवला जाईल. या दोन संघांमधील सामने नेहमीच दिवस-रात्रीचे असतात.
भारतीय क्रिकेट संघाचे सर्व सामने अमेरिकेतच खेळवले जातील, असा दावाही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. लाखो भारतीय वंशाचे लोक अमेरिकेत राहतात आणि भारतीय संधाचे तिथे खूप चाहते आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय, 2028 मध्ये लॉस एंजेलिसमध्ये ऑलिम्पिक देखील होणार आहे ज्यामध्ये क्रिकेटचा देखील समावेश करण्यात आला आहे आणि म्हणूनच टी20 विश्वचषक तिथे खेळला जात आहे. (If so On this date, India-Pakistan will come face-to-face and will play a World Cup match)
हेही वाचा
व्हायरल व्हिडीओः जेव्हा तू बॅटिंगला येतोस तेव्हा ते लावतात ‘राम सिया राम’, स्टंप माईकवर राहुलचा आवाज कॅच
बाप तसा बेटा! राहुल द्रविडचा मुलगा समितचा क्रिकेटमध्ये भीमपराक्रम