रविवारी (दि. 17 एप्रिल) भारतीय संघाचा माजी कर्णधार ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने आयपीएल पदार्पण केले. 2 षटकांत 17 धावा देताना अर्जुनला एकही विकेट घेता आली नाही. अर्जुनने एक चेंडू वाईड टाकला. असं असलं तरी अर्जुनच्या पदार्पणामुळे तेंडुलकर परिवाराच्या नावावर एक खास विक्रम मात्र झाला आहे.
सन 1999 साली जन्म झालेल्या अर्जुनने 23व्या वर्षी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आयपीएलमधला पहिला चेंडू टाकला. त्याने 2022मध्ये अ दर्जाच्या व प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले, तर 2021 मध्ये ट्वेंटी-ट्वेंटी पदार्पण केले होते. त्यानंतर तब्बल 3 वर्षांच्या गॅपने अर्जुनने आयपीएल पदार्पण केले आहे.
अष्टपैलू क्रिकेटर असलेल्या अर्जून तेंडुलकर (Arjun Tendulkar) याला पहिल्या सामन्यात केवळ गोलंदाजीचा संधी मिळाली. जेव्हा तो पहिला चेंडू टाकण्यासाठी धावला तेव्हा मात्र त्याच्या नावावर एक विक्रम झाला. आयपीएलच्या 16 वर्षांच्या इतिहासात क्रिकेटर खेळलेले सचिन तेंडुलकर व अर्जुन तेंडुलकर हे पहिले बाप-लेक जोडी बनले. 2008 साली वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आपला पहिला सामना चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध खेळला होता. 2013 मध्ये सचिनने वानखेडेवरच आपला शेवटचा आयपीएल सामना हैदराबाद संघाविरुद्ध खेळला. त्यानंतर आता तब्बल 10 वर्षांनी तेंडुलकर परिवारातील एक सदस्य थेट वानखेडेवर क्रिकेट खेळताना दिसला.
सचिन जेव्हा पहिला सामना खेळला, तेव्हा तो 36 वर्षांचा होता. शेवटचा सामना खेळला तेव्हा सचिनचे वय 40 वर्ष होते. अर्जुन केवळ 23 वर्षांचाच असल्यामुळे त्यासमोर मोठे आयपीएल करिअर वाढून ठेवले आहे. अर्जुनच्या पदार्पणावर 49 वर्षीय मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने छान पोस्ट लिहिली आहे. ती सध्या सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/p/CrGnSQvsN1B/?igshid=YmMyMTA2M2Y=
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आजपर्यंत अनेक बाप लेक क्रिकेट खेळताना दिसले. चंद्रपॉल व त्याचा मुलगा, तर देशांतर्गत क्रिकेट एकत्र खेळले. परंतू आयपीएलमध्ये मात्र असं आजपर्यंत पाहायला मिळालं नव्हतं. अर्जुन मैदानावर खेळत असताना सचिन मुंबईच्या डगआऊटमध्ये होता. ही सर्वच क्रिकेटप्रेमींसाठी व खासकरून मुंबई इंडियन्सच्या फॅन्ससाठी आनंदाची गोष्ट होती. (How many fathers played IPL before Sachin-Arjun Tendulkar? Read briefly)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आरसीबीविरुद्धच्या सामन्यापूर्वी धोनीच्या दुखापतीविषयी धक्कादायक ब्रेकिंग! बॅटिंग कोच स्पष्टच म्हणाला…
‘2000 टक्के सांगतो एमएस धोनी यावर्षी आयपीएलमधून निवृत्त होणार’, माजी सहकाऱ्याचा मोठा दावा






