---Advertisement---

‘इंग्लंडसाठी किती सूटकेस भरून कपडे आणलेस’ दिनेश कार्तिकचा ‘हा’ फोटो पाहून ऑसी क्रिकेटरचा प्रश्न

On: मंगळवार, ऑगस्ट 10, 2021 11:52 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक सध्या मैदानावर खेळताना दिसून येत नाही. परंतु, तो त्याच्या समालोचनाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. दिनेश कार्तिकने भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेत त्याच्या समालोचनाने सर्वांची मने जिंकली आहेत. इतकेच नव्हे तर त्याच्या ड्रेसिंग सेन्स आणि कपडे घालण्याच्या पद्धतीने अनेकांची वाहवा मिळवली आहे.

नुकताच त्याने इंस्टाग्रामवर त्याने नवीन फोटो पोस्ट केला आहे. ज्यात त्याने काळ्या रंगाचा सेमी-एथेनिक ड्रेस घातलेला दिसून येत आहे. त्यांच्या या पोस्टवर कमेंट्सचा जवळजवळ वर्षाव होत आहे. त्याचबरोबर कार्तिकचा कोलकाता नाईट रायडर्स संघातील साथीदार पॅट कमिन्सही त्याच्या फॅशन सेन्सने प्रभावित झाला आहे. पण कार्तिकची मजा घेण्यापासून तो स्वतःला अडवू शकला नाही.

https://www.instagram.com/p/CSWlwNxo1M8/

कार्तिकचे कपडे पाहून कमिन्सने त्याला विचारले की, ‘इंग्लंडसाठी किती सूटकेस भरून कपडे आणले होते.’ तसा पाहायला गेले तर, कार्तिक जून महिन्यांपासून इंग्लंडमध्ये आहे. तो स्काय स्पोर्ट्सच्या कॉमेंट्री पॅनलवर आहे. भारत आणि इंग्लंड संघात सुरू असलेल्या कसोटी मालिकेव्यतिरिक्त तो ‘द हंड्रेड’ साठी ही समालोचन करत आहे.

Screengrab: Instagram/Dinesh Karthik

दिनेश कार्तिकने साऊथॅम्प्टन येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात समालोचनात पदार्पण केले होते. कमी कालावधीतच सुनील गावस्कर सारख्या दिग्गजांना त्यांच्या खेळाबद्दलच्या सखोल ज्ञानाने प्रभावित केले होते. त्याचबरोबर चाहत्यांची ही त्याने मन जिंकले आहेत.

कार्तिक लवकरच क्रिकेटच्या मैदानावरही दिसणार आहे. आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा पुढील महिन्यात यूएईमध्ये खेळला जाणार आहे. यामध्ये केकेआर संघाचा कार्तिक एक भाग आहे. कोरोनामुळे आयपीएलचा पहिला टप्पा पुढे ढकलण्यापूर्वी त्याने ७ सामन्यांमध्ये त्याने १२३ धावा केल्या होत्या. केकेआर संघाने पहिल्या टप्प्यात ७ पैकी फक्त २ सामने जिंकले आहेत. हा संघ गुणतालिकेत ७ व्या स्थानावर होता. अशा परिस्थितीत, केकेआर संघ निश्चितपणे दुसऱ्या टप्प्यात सुधारणा करताना पाहायला आवडेल.

महत्त्वाच्या बातम्या – 

इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ जिंकेल कसोटी मालिका, पाकिस्तानी दिग्गजाने बांधले कौतुकाचे पूल

आधी कर्णधारपद गेलं, मग संघातील स्थानही; उर्वरित आयपीएल हंगामात खेळणार का वॉर्नर? घ्या जाणून

मयंक भाऊ परतले, सरावालाही लागले; पण लॉर्ड्स कसोटीत मिळेल का सलामीला संधी?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---