---Advertisement---

मयंक भाऊ परतले, सरावालाही लागले; पण लॉर्ड्स कसोटीत मिळेल का सलामीला संधी?

On: मंगळवार, ऑगस्ट 10, 2021 9:57 PM
Rohit-Sharma-Mayank-Agarwal
---Advertisement---

इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाचा सलामीचा फलंदाज मयंक अगरवाल दुखापतग्रस्त झाला होता. सामन्यापूर्वी सरावादरम्यान नेट्समध्ये मोहम्मद सिराजचा चेंडू अगरवालच्या हेल्मेटला जाऊन लागला. त्यामुळे दुखापतग्रस्त झाल्याने अगरवालला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातून मुकावे लागले.

हाच अगरवाल आता तंदुरुस्त झाला आहे. तसेच मंगळवारी (१० ऑगस्ट) त्याने नेट्समध्ये सरावाला देखील सुरुवात केली आहे. परंतु पुढील सामन्यात अगरवाल खेळेल की नाही? याबाबत अद्याप भारतीय व्यवस्थापकांकडून कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सवर १२ ऑगस्टपासून खेळवला जाणार आहे.

पहिल्या कसोटी सामन्यापूर्वीच शुभमन गिलने दुखापतीमुळे घरवापसी केली होती. तसेच अगरवाल सरावादरम्यान दुखापतग्रस्त झाल्याने त्याच्याऐवजी केएल राहुलला सलामी फलंदाज म्हणून संघात स्थान देण्यात आले होते. तत्पूर्वी खूप दिवसांनी भारतीय कसोटी संघात पुनरागमन केलेल्या राहुलने सराव सामन्यात शतकीय खेळी केली होती. तसेच इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात नॉटिंघमधील गोलंदाजीला पूरक असलेल्या मैदानावरही ८४ धावा केल्या. त्यामुळे राहुल सर्वांच्या कौतुकाला पात्र ठरला आहे.

अशात दुसऱ्या कसोटी सामन्यात अगरवालला भारतीय संघात संधी मिळेल की नाही? यावर शंका व्यक्त केली जात आहे. मात्र अगरवालला खेळवायचे झाल्यास भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली केएल राहुलला मधल्या फळीत खेळवू शकतो व अगरवालला सलामीला खेळायला संधी देऊ शकतो. किंवा अगरवालला पुढील सामना खेळण्यासाठी आणखी वाटसुद्धा बघावी लागू शकते.

दरम्यान, इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पहिला कसोटी सामना जिंकण्यासाठी पाचव्या दिवशी भारताला केवळ १५७ धावांची गरज होती. असे असताना पावसामुळे पावच्या दिवसाचा खेळ रद्द झाला आणि सामना अनिर्णीत घोषित करण्यात आला. यानंतर आता लॉर्ड्समध्ये होणारा दुसरा कसोटी सामना जिंकत मालिकेत आघाडी घेण्याकडे उभय संघांचे लक्ष असेल.

महत्वाच्या बातम्या –

“एकट्या शेफाली वर्माने ऑस्ट्रेलियाच्या आख्ख्या संघापेक्षा जास्त धावा केल्या”

इंग्लंडची टॉप ऑर्डर भारतीय आक्रमणासमोर ठरली निष्प्रभ; माजी क्रिकेटरने सांगितले यामागचे कारण

दोन भागात विभागला गेला न्यूझीलंड संघ; लॅथमचा संघ करणार बांगलादेश दौरा, तर विलियम्सनचा संघ खेळणार टी२० विश्वचषक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---