---Advertisement---

“एकट्या शेफाली वर्माने ऑस्ट्रेलियाच्या आख्ख्या संघापेक्षा जास्त धावा केल्या”

On: मंगळवार, ऑगस्ट 10, 2021 9:37 PM
---Advertisement---

भारताची सलामीवीर शफाली वर्मा सध्या इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या द हंड्रेड लीगमध्ये खेळत आहे. तसेच ती या लीगमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचेही दिसले आहे. नुकतेच तिने द हंड्रेड लीगमध्ये 42 चेंडूत 76 धावा करून तिच्या संघाच्या 10 विकेट्सच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. तिच्या या खेळीचा संदर्भ देत इंग्लंडची माजी महिला क्रिकेटपटूने बांगलादेश दौऱ्यावर गेलेल्या ऑस्ट्रेलियाच्या पुरुष संघावर टीका केली आहे.

सध्या ऑस्ट्रेलियन संघाला सर्वत्र फटकारले जात आहे. ऑस्ट्रेलियन संघाला बांगलादेशविरुद्ध च्या हाती पाच टी२० सामन्यांच्या मालिकेत 1-4 असा पराभव स्वीकारावा लागला. याशिवाय त्यांच्या नावावर बांगलादेशविरुद्ध 5 व्या आणि शेवटच्या टी -20 सामन्यातही लाजिरवाणा विक्रम झालाला. बांगलादेशने दिलेल्या 123 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघ 13.4 षटकांत अवघ्या 62 धावांवर सर्वबाद झाला.

आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील ऑस्ट्रेलियाची ही सर्वात कमी धावसंख्या आहे. बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने 9 धावांत 4 बळी घेतले. याआधी, टी -20 मध्ये ऑस्ट्रेलियाची सर्वात कमी धावसंख्या 79 धावा होती. जी त्याने 2005 मध्ये इंग्लंडविरुद्ध केली होती.

इंग्लंडची माजी महिला क्रिकेटपटू इसाबेल वेस्टबरी म्हणाली की, “त्याच दिवशी भारताची सलामीवीर शफाली वर्माने संपूर्ण ऑस्ट्रेलिया संघापेक्षा जास्त धावा केल्या. शेफलीने बर्मिंगहॅम फिनिक्सकडून द हेंड्रेड लीगमध्ये वेल्श फायरविरुद्ध 42 चेंडूत 76 धावा करून 10 विकेट्सच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.”

शेफाली वर्माही एक भारतीय क्रिकेटपटू आहे. जी भारताच्या महिला संघाकडून खेळते. आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात भारताकडून खेळणारी ती सर्वात कमी वयाची खेळाडू आहे. हे तिचे एक वैशिष्ट्य आहे. शेफालीने वयाच्या 15 व्या वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले अर्धशतक झळकावले होते. महान खेळाडू सचिन तेंडुलकर यांचा 30 वर्षे जुना विक्रम मोडीत काढला. सचिन यांनी तिचे पहिले अर्धशतक एका कसोटी सामन्यात केले होते, तेव्हा तिचे वय सोळा वर्षे होते.

महत्त्वाच्या बातम्या – 

इंग्लंडची टॉप ऑर्डर भारतीय आक्रमणासमोर ठरली निष्प्रभ; माजी क्रिकेटरने सांगितले यामागचे कारण

दोन भागात विभागला गेला न्यूझीलंड संघ; लॅथमचा संघ करणार बांगलादेश दौरा, तर विलियम्सनचा संघ खेळणार टी२० विश्वचषक

न्यूझीलंडने टी२० विश्वचषकाच्या संघातून बाहेर केल्यानंतर ३ शतकं केलेला खेळाडू म्हणतोय, ‘कदाचीत मी अखेरचा सामना खेळलोय’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---