---Advertisement---

न्यूझीलंडने टी२० विश्वचषकाच्या संघातून बाहेर केल्यानंतर ३ शतकं केलेला खेळाडू म्हणतोय, ‘कदाचीत मी अखेरचा सामना खेळलोय’

On: मंगळवार, ऑगस्ट 10, 2021 8:18 PM
---Advertisement---

यंदाच्या टी-२० विश्वचषक २०२१ च्या स्पर्धेचे आयोजन भारतात होणार होते. परंतु भारतातील कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसीने) यंदाचे टी-२० विश्वचषक स्पर्धा यूएई येथे स्थलांतरित केली. त्यामुळे आता ही स्पर्धा यूएईमध्ये १७ ऑक्टोंबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान खेळविण्यात येणार आहे.

या स्पर्धेसाठी सर्व संघांची जोरदार तयारी चालू आहे. सर्व संघातील खेळाडूंचा टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अनुषंगाने जोरदार सराव चालू आहे. अशात न्यूझीलंडच्या संघाने टी-२० विश्वचषकासाठीचा आपला १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. ज्यात न्यूझीलंड संघाचा विस्फोटक फलंदाज कॉलीन मुनरोला संघातून वगळण्यात आले आहे. यावर त्यानी आपली नाराजी देखील व्यक्त केली.

संघात संधी न मिळाल्याने याबाबत बोलताना मुनरो म्हणाला, “आगामी टी-२० विश्वचषकासाठी मला संघातून वगळण्यात आले. या निर्णयामुळे मी खूप निराश झालो आहे. मला या आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळायचे होते. आता मला वाटते की, माझा न्यूझीलंडसाठीचा शेवटचा सामना खेळून झाला आहे.”

मुनरोने न्यूझीलंड संघाकडून खेळताना एकूण ६५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ज्यात त्याने ३ शतके सुद्धा केले आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मानंतर मुनरो दुसऱ्या स्थानावर आहे. रोहितने आतापर्यंत ४ टी-२० शतके लगावले आहेत.

तसेच मुनरोने आतापर्यंतच्या ६५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील ६२ डावांत १५६.४४ च्या स्ट्राईक रेटने एकूण १७२४ धावा केल्या आहेत. ज्यात त्याची सरासरी ३१.३१ अशी होती. मुनरो हा न्यूझीलंड संघाचा आक्रमक सलामीवीर फलंदाज आहे. टी-२० विश्वचषकासाठी त्याची संघात निवड झाल्याने त्यानी निराशा व्यक्त केली.

टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठीचा न्यूझीलंडचा संघ –
केन विलियमसन (कर्णधार), डेरेल मिशेल, जिमी निशम, ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, मिशेल सॅन्टनर,टीम सीफर्ट, टाॅड एस्ले, ग्लेन फिलिप्स, डेव्हाॅन कॉनवे, लॉकी फर्गुसन, ईश सोढी, मार्टिन गप्टील, काईल जेमिसन, टीम सऊदी.

महत्वाच्या बातम्या –

तब्बल ताशी १६१.१ किमी वेगाने चेंडू टाकणारा ‘हा’ ऑसी खेळाडू सांभाळणार अफगाणिस्तानचे गोलंदाजीचे प्रशिक्षकपद

राहुल द्रविडकडून जाणार एनसीए संचालकपद? बीसीसीआयने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

“माझ्यासाठी खेळानंतरच स्टाईल”, ‘त्या’ निर्णयाबाबत नीरजचा महत्त्वपूर्ण खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---