मॉस्को | रशियामध्ये 2018 चा 21 वा फिफा विश्वचषक नुकताच पार पडला. यामध्ये बलाढ्य फ्रान्सने क्रोएशियाला 4-2 अशा गोलफरकाने पराभूत करत दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद मिळवले.
या फिफा विश्वचषकात विजेते, उपविजेते आणि तिसऱ्या स्थानी राहिलेल्या संघावर फिफाने बक्षिसांचा वर्षाव केला आहे.
फ्रान्सला या विश्ववितेपदासाठी फिफाकडून तब्बल 260 कोटी रु. इतकी रक्कम बक्षिस म्हणुन मिळणार आहे.
विश्वचषकाच्या इतिहासात अप्रतिम खेळ करत प्रथमच अंतिम फेरी गाठणाऱ्या क्रोएशियाला यामध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
क्रोएशियाला फिफा विश्वचषकाच्या उपविजेतेपदा बद्दल फिफाकडून 192 कोटी रु. इतकी रक्कम बक्षिस म्हणुन मिळणार आहे.
फिफा विश्वचषक 2018 च्या तिसऱ्या स्थानासाठी इंग्लंड आणि बेल्जियम यांच्यात लढत झाली होती.
यामध्ये बेल्जियमने इंग्लंडला 2-0 अशा गोलफरकाने पराभूत करत तिसरे स्थान पटकावले. या तिसऱ्या स्थानासाठी बेल्जियमला फिफाकडून 164 कोटी रु. बक्षिस मिळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-फिफा विश्वचषक २०१८: क्रोएशियाच्या लुका मॉड्रीकला गोल्डन बॉल पुरस्कार
-फिफा विश्वचषक २०१८: फ्रांसने पटकावले दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद