T20 World Cup 2024: आयसीसीने यावर्षी खेळल्या जाणाऱ्या टी20 विश्वचषक 2024 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. आयसीसीने या स्पर्धेसाठी भारत आणि पाकिस्तान या संघांना एकाच गटात ठेवले आहे. टी20 विश्वचषकासाठी आयसीसीने भारत आणि पाकिस्तानला एकाच गटात ठेवल्याचे अनेक दिवसांपासून दिसून येत आहे. यावेळी दोन्ही संघ अ गटात आहेत, हे पाहून आईसलँड क्रिकेटने म्हटले की, दोघांना एकाच गटात न ठेवण्यासाठी आयसीसीला किती पैशांची गरज आहे?
2024 च्या टी20 विश्वचषकासाठी भारत आणि पाकिस्तानला एकाच गटात पाहून आइसलँड क्रिकेटने ट्विट केले की, “आयसीसीला विश्वचषकासाठी भारत आणि पाकिस्तानला एकाच गटात न ठेवण्यासाठी किती पैशांची गरज आहे?”
How much money does the ICC require not to put India and Pakistan in the same World Cup group?
— Iceland Cricket (@icelandcricket) January 5, 2024
विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जाणारा सामना प्रेक्षक मोठ्या उत्सुकतेने पाहतात. यामुळे आयसीसीने दोन्ही संघांना एकाच गटात ठेवले आहे, जेणेकरून गट टप्प्यात दोघांमध्ये सामना खेळवला जाऊ शकतो. याआधी 2022 च्या टी20 विश्वचषकातही भारत आणि पाकिस्तानचे संघ एकाच गटात होते आणि दोघांमध्ये खेळला गेलेला ग्रुप स्टेजचा सामना खूपच रोमांचक होता.
2024 मध्ये खेळल्या जाणाऱ्या टी20 विश्वचषक स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होतील, ज्यांना A ,B,C,D चार गटांमध्ये विभागण्यात आले आहे. अ गटात भारत आणि पाकिस्तानसह आयर्लंड, कॅनडा आणि अमेरिका या संघांचा समावेश आहे. या स्पर्धेला 1 जूनपासून सुरुवात होणार असून भारतीय संघ 5 जूनला आयर्लंडविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.
त्यानंतर भारतीय संघ ग्रुप स्टेजचा दुसरा सामना पाकिस्तानविरुद्ध 09 जून रोजी खेळणार आहे, जो न्यूयॉर्कमध्ये होणार आहे. यानंतर गटात भारताचा सामना अमेरिका आणि कॅनडाशी होणार आहे. भारत ग्रुप स्टेजचे सर्व सामने अमेरिकेत खेळणार आहे. (How much will it cost ICC to not put India-Pakistan in the same World Cup group- Iceland Cricket)
हेही वाचा
Rashid Khan: टी20 संघात असूनही राशिद खान भारताविरुद्ध का खेळणार नाही?, मोठे कारण आले समोर, वाचाच
T20 Future of Rohit-Virat: जय शहाच रोहित-विराटचं टी20 भविष्य ठरवू शकतात, घेऊ शकतील ‘हा’ मोठा निर्णय