---Advertisement---

शुबमन गिल भारताचा उपकर्णधार कसा झाला? रोहित शर्माने सांगितले मोठे कारण!

On: गुरूवार, फेब्रुवारी 20, 2025 4:28 PM
Rohit-Sharma-And-Shubman-Gill
---Advertisement---

आज भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील त्यांचा पहिला सामना खेळत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघासमोर आज बांगलादेशच आव्हान असणार आहे. दोन्ही संघांमध्ये हा सामना आज दुबई इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये खेळला जात आहे. या सामन्याआधी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा ने संघाच्या उपकर्णधार शुबमन गिल याच्यावर वक्तव्य केले आहे.

रोहित शर्मा ने सांगितले की शुबमन‌ गिल ला‌‌ भारतीय संघाचा उपकर्णधार का केले ? रोहित शर्माचं म्हणणं आहे की, गिल अव्वल दर्जाचा फलंदाज आहे. त्याच्या खेळण्याच्या पद्धतीवर शंका घेणे योग्य नाही.

रोहित शर्मा म्हणाला की शुबमन गिलचे आकडे शानदार आहेत. मागच्या तीन वर्षांत सलग शुबमनने खेळामध्ये चांगले प्रदर्शन केले आहे. खास करून त्याने 50 वनडे सामन्यांमध्ये 60 च्या एवरेज ने 2587 धावा केल्या आहेत. हे आकडे हेच सांगतात की शुबमन गिल खूप महत्त्वाचा आणि यशस्वी खेळाडू आहे. म्हणूनच आम्ही शुबमन गिल ला भारतीय संघाचा उपकर्णधार करण्याचा निर्णय घेतला. याचबरोबर रोहित म्हणाला आम्ही आशा करतो की चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये शुबमन त्याचा‌ खेळातील फॉर्म शानदार ठेवेल.

काल 19 फेब्रुवारी रोजी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात झाली आहे. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानला 60 धावांनी पराभूत करत मोठ्या संख्येने विजय मिळवला. तसेच आज भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील त्यांचा पहिला सामना खेळत आहे. भारत-बांगलादेश दोन्ही संघात आज दुबईमध्ये सामना खेळला जात आहे. भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी मधील त्यांचा शेवटचा सामना न्यूझीलंडच्या विरुद्ध 2 मार्च रोजी खेळेल.

 

हेही वाचा 

IND vs BAN; रोहित शर्माच्या चुकामुळे अक्षर पटेलच्या हॅट्ट्रिकची संधी हुकली!

वीरेंद्र सेहवाग आणि पार्थिव पटेलची बाबर आझमवर खिल्ली, चाहत्यांमध्ये चर्चा

आम्ही कोणत्याही संघाला हरवू शकतो! भारतालाही पराभूत करणार का बांगलादेश ? काय म्हणाला कर्णधार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---