आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान भारतात पार पडणार आहे. या स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 14 ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, हा सामना आधी 15 ऑक्टोबर रोजी खेळला जाणार होता. मात्र, आता हा सामना एक दिवस आधी खेळवला जाणार आहे. खरं तर, सुरक्षेच्या कारणास्तव हा सामना 14 ऑक्टोबर रोजी पार पडेल.
वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेच्या नवीन वेळापत्रकानुसार भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघातील सामना आता 15 ऑक्टोबर ऐवजी 14 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. सुरक्षा एजन्सींनी बीसीसीआयला आग्रह केला होता की, एक दिवस आधी सामन्याचे आयोजन केले जावे. कारण, या दिवशीपासून नवरात्रीला सुरुवात होत आहे. गुजरातमध्ये नवरात्रीत खूप गर्दी असते. अशात हा सामना एक दिवस आधी खेळला जाणार आहे. मात्र, सामन्याच्या ठिकाणात कोणताही बदल झाला नाहीये. हा बहुप्रतिक्षित सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअम (Narendra Modi Stadium) येथेच खेळला जाणार आहे.
सामन्याची तिकीटे कधीपासून बुक करायची?
भारतात अनेक वर्षांनंतर भारत विरुद्ध पाकिस्तान संघ आमने-सामने येणार आहेत. अशात या सामन्यासाठी चाहत्यांची उत्सुकता गगनाला भिडली आहे. प्रत्येकजण हा सामना थेट स्टेडिअममध्ये जाऊन पाहू इच्छितो. लोकांच्या मनात तिकिटांविषयी सर्वात मोठा प्रश्न असा आहे की, या सामन्याची तिकीटे कधी आणि कशी बुक करायची. चला तर, जाणून घेऊयात…
भारत विरुद्ध पाकिस्तानसह विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेतील सामन्यांची तिकीटे 25 ऑगस्टपासून विकली जाणार आहेत. मात्र, चाहते त्यापूर्वी म्हणजेच 15 ऑगस्टपासून आधीच रजिस्ट्रेशन करू शकतात. यामुळे त्यांना तिकिटांविषयी माहिती मिळत राहील. यासाठी चाहत्यांना क्रिकेट विश्वचषकाच्या www.cricketworldcup.com/register या वेबसाईट जावे लागेल. चाहते आयसीसीची वेबसाईट आणि अधिकृत तिकीट भागीदारांच्या वेबसाईटवर जाऊन बुक करू शकतात. (how to book icc odi world cup 2023 matches tickets including india vs pakistan know here)
महत्त्वाच्या बातम्या-
नॅशनल अँटी डोपिंग टेस्टचे आकडे समोर, ‘या’ भारतीय धुरंधराने 2023मध्ये केली सर्वाधिक वेळा Doping चाचणी
पृथ्वी शॉने द्विशतक ठोकताच ट्विटरवर प्रतिक्रियांचा महापूर; नेटकरी म्हणाले, ‘भविष्यातील सेहवाग, आता गिलला…’