भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा प्रत्येक संघासाठी तसेच प्रत्येक गोलंदाजासाठी अवघड कोडे बनला आहे. विराटची विकेट सामना फिरवू शकते. त्यामुळे त्याचा दरारा निर्माण झाला आहे. त्याची विकेट काढण्याची युक्ती पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज वकार युनिसला सापडली आहे.
इंग्लडमधील मलिकेत कोहलीने शानदार प्रदर्शन करत 593 धावा केल्या होत्या. ह्या कामगिरीच्या बळावर त्याने आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिले स्थान काबीज केले आहे. बाकीचे फलंदाज संर्घष करत असताना कोहलीने खोऱ्याने धावा काढल्याने तो ह्या पीढीतील सर्वोत्तम फलंदाज ठरला आहे.
कोहली फलंदाजी करताना अत्यंत सावध असतो. तो मैदानावर मानसिकदृष्ट्या सक्षम आहे.तरीही त्याला बाद करण्याची पद्धत सापडल्याचा दावा पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वकार युनिस करत आहे.
“सगळ्यांत काहीना काही कमतरता असते तशी विराट कमतरता म्हणजे त्याला स्टम्पच्या ऑफ साईडला आहे. कारण तो लवकर ड्राईव करत असतो. त्यामुळे गोलंदाजाने त्याला गोलंदाजी करताना चाणाक्ष राहीले पाहीजे आणि आपल्या नियोजनानुसारच कार्य केले पाहिजे,” असे वकारने खलीज टाईम्सला सांगितले.
“मी जर त्याला गोलंदाजी करत असतो तर आउट स्विंग चेंडू टाकून त्याला फटका मारण्याचे निमंत्रण दिले असते,” असे त्याने पुढे बोलताना सांगितले.
71 कसोटी सामन्यात विराटने 122 डावात त्याने 23 शतक ठोकली आहेत. वन-डेत त्याने 35 शतक केले आहेत.
आगामी वेस्ट इडिंज आणि त्यानंतरचा ऑस्ट्रेलियाचा दौरा भारतीय संघासाठी महत्वाचा आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-२०१९ क्रिकेट विश्वचषकात टीम इंडियाच असणार सर्वात वयस्कर संघ
-रोहित शर्माला कसोटी संघात न घेतल्यामुळे भज्जी भडकला!
-अशी आहे एशिया कप स्पर्धेतील सर्वोत्तम 11 खेळाडूंची यादी